शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (09:27 IST)

Russia Ukraine War: युद्धात कामिकाझे ड्रोनने कीव मध्ये स्फोट, शहर हादरले

Russia Ukraine War : रशियाने युक्रेनची राजधानी कीववर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. हे हल्ले इराणी बनावटीच्या कामिकाझे ड्रोनने करण्यात आले. अनेक स्फोटांनी कीव शहर हादरले. 
 
कीवमध्ये रशियन हवाई हल्ल्यानंतर सायरन आणि स्फोट ऐकू आले. ड्रोन हल्ल्यांमुळे शेवचेन्किव्स्की परिसरातील निवासी इमारतींचे नुकसान झाले, असे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितले. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाचे प्रमुख आंद्रे येरमाक यांनी सांगितले की, हे हल्ले कामिकाझे ड्रोनद्वारे करण्यात आले. गेल्या आठवड्यातही कीव आणि युक्रेनच्या इतर शहरांवर रशियन क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये अनेक लोक मारले गेले. 
कीवमध्ये काल रात्री ताजे बॉम्बस्फोट झाले. क्लिटस्को म्हणाले की ते त्या वेळी शेवचेन्किव्स्की जिल्ह्यात होते, जिथे गेल्या आठवड्यात अनेक हल्ले झाले.
युक्रेन-रशिया युद्धादरम्यान प्रथमच कीवच्या मध्यवर्ती भागाला थेट लक्ष्य करण्यात आले
 
 
 
Edited By- Priya Dixit