शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

सचिन आणि 10 चा संबध

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दहा या क्रमांकाचा खूप जवळचा संबंध आहे. ग्वाल्हेर एकदिवसीय सामन्यात द्विशतकी खेळी करताना दहा या क्रमांकाचा वारंवार संबंध आला. सचिन आणि 10 च्या संयोगाची माहिती क्रिकेट तज्ज्ञांनाही चकीत करणार आहे.

(1) ग्वाल्हेर वन-डे सचिनची 442 सामना होतो. 4+4+2 =10.
(2) वन-डे मध्ये सचिनचे 46 शतक होते. 4 आणि 6 ची बेरीच दहा येते.
(3) सचिनने द्विशतक करताना 25 चौकार आणि तीन षटकार मारत 28 वेळा चेंडू सीमारेषेबाहेर टाकला. 2+8=10.
(4) फक्त चौकार आणि षटकाराच्या मदतीने त्याने 118 धावा केल्या. 1+1+8=10.
(5) ‍द्विशतकी खेळीत सचिनने 82 धावा पळून काढल्या. 8+2=10.
(6) सचिनने पहिले द्विशतक 2010 मध्ये केले. यामध्येही 10 क्रमांक येतो.
(7) सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 649 धावा केल्या. (भारत 401, आफ्रिका 248) 6+4+9=19 होतात. 19 ची पुन्हा बेरीज केल्यास 1+9=10.
(8) ज्यावेळी भारताने सामना जिंकला त्यावेळी आफ्रिकेला 154 धावांची गरज होती. 1+5+4=10.
(9) द्विशतक करताना सचिन 37 वर्षांचा आहे. 3+7=10.
(10) सामना जिंकल्यानंतर ग्वाल्हेर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने 10 लाखाचा चेक दिला.

सचिनचा 10 क्रमांकाशी अन्य संदर्भ

(1) सचिन भारताकडून खेळताना 10 क्रमांकाचा टी-शर्ट वापरतो.
(2) सचिनने वन-डे मधील 10 हजार धावा ऑस्‍ट्रेलिया विरुद्ध 31 मार्च 2001 रोजी केल्या. या तारखेची बेरीज
3+1+0+3+2+0+0+1=10.
(3) सचिनचे नाव एस अक्षरने सुरु होतो. तो इंग्रजी वर्णमालेत 19 व्या क्रमांकावर आहे. 1+9=10.
(4) सचिनने 1996 च्या वर्ल्‍डकपमध्ये 523 धावा केल्या होत्या. त्यांची बेरीज 5+2+3=10.