सिद्धूची दुखापत सचिनच्या पथ्थावर
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभव फलंदाज सचिन तेंडुलकर याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याने आपल्या जीवनातील अनेक रहस्य उघड केले आहे. सलामीवीर सिद्धला झालेली दुखापत सचिनचा पथ्थावर पडली. त्यानंतर तो मध्यल्या फळीऐवजी सलामीस येऊन खेळू लागला. सचिनने सांगितले की, 1994 साली आम्ही न्यूझीलंड दौर्यावर गेलो होतो. त्यावेळी नवज्योत सिद्धू भारतीय संघाकडून सलामीस येत होतो. परंतु सामन्यापूर्वी त्याच्या मानेला दुखापत झाली. यामुळे भारतीय संघासमोर सलामीचा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि प्रशिक्षक अजित वाडेकर यांना आपणास सलामीस जाण्याची संधी द्यावी, असे सांगितले. त्यानंतर मधल्या फळीतून मी सलामीस येऊ लागलो.