शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

'थ्री इडियट्स'नंतर सचिन रमला बालपणात

बॉलिवूड स्टार आमिरखान याने बनविलेल्या 'थ्री इडियट्स' चित्रपट पाहून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आपल्या बालपणातील आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी आपण किती खोडकर होतो, याचे किस्से त्याने सांगितले.

सचिनने बायको अंजली आणि अजित आगरकरसह काही मित्रांबरोबर 'थ्री इडियट्स' हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट आपणास आवडल्याचे त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले. 25 डिसेंबर रोजी प्रदर्शीत होणार्‍या या चित्रपटात कॉमेडी आणि प्रेम असा सर्व मसाला आहे. चित्रपटात आमिरने 22 वर्षीय अभियांत्रिक विद्यार्थ्याची भूमिका केली आहे.

चित्रपटानंतर बोलताना सचिन आपल्या बालपणातील आठवणी ताज्या झाल्याचे सांगितले. या चि‍त्रपटाचा प्रमोशनमध्ये आमिरखान उपस्थित नव्हता, त्याबद्दल सचिनला विचारले असतो तो म्हणाला की, तीन दिवसांपूर्वी माझी आणि आमिरची भेट झाली होती. त्यावेळी त्याने माझ्याजवळ एक कागद देऊन तो माध्यमांसमोर वाचण्याचे सांगितले होते. त्या कागदात ‘कहां जाउं, कैसे जाउं इतने सवाल कैसे सुलझाउं कभी तो सोचूं मैं उड़ जाउं कभी सड़क पर कार भगाउं या छुक छुक गाड़ी को आजमाउं चाहे मैं जैसे भी जाउं मां के आंगन में रात बिताउं।' असे कोडे लिहिलेले सचिनने वाचून दाखविले. चि‍त्रपटाचा प्रमोशनचा नवीन फंडा असल्याचे त्यानंतर स्पष्ट झाले. या फंड्यानुसार आमिर सात शहरांमध्ये जाऊन सात संकेत आपल्या उपस्थितीबद्दल देणार आहे.