देशवासियांचे प्रेमाने चांगल्या कामगिरीची प्रेरणा- सचिन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण केल्याबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी सचिन तेंडुलकर याचा सत्कार केला आहे. श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी सचिनचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना सचिन म्हणाला,' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मी 20 वर्ष पूर्ण केल्याबद्दल खूप सत्कार करण्यात आला. परंतु आता सर्व लक्ष श्रीलंकेविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेकडे केंद्रीत केले आहे. मला भारतीय क्रिकेट संघ, प्रशिक्षक, खेळाडू, परिवार आणि एक अब्ज भारतीयांचे प्रेम मिळाले आहे. हे प्रेमच मला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त करते. 'श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मी जेव्हा मैदानावर उतरले तेव्हा फक्त विजय मिळविण्याकडेच लक्ष केंद्रीत करेल. माझ्या देशातील क्रिकेटप्रेमींचा चेहर्यावर हस्य मला पाहयाचे आहे. त्यासाठी नेहमी मी शंभर टक्के योगदान देत असतो, असे सचिनने सांगितले.