बाबा रामदेव यांनीही केलेले सचिनेचे कौतूक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण करणार्या सचिन तेंडुलकरचे अमिताभ बच्चन, लता मंगेशकरसारखे अनेक रथी महारथी 'फॅन' आहेत. त्यात योग गुरु बाबा रामदेव यांचीही भर पडली आहे. त्यांनीही सचिनचे कौतूक केले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण करीत असल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. बाबा रामदेव यांनी सांगितले की, अदम्य साहस, पराक्रम, संयम एकाग्रता आणि सादगीपूर्ण जीवन सचिन व्यतीत करीत आहे. सलग 20 वर्ष खेळून सर्वश्रेष्ठ कामगिरी करीत त्याने देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याचे जीवन वादविवादापासून दूर राहिले आहे. त्याने भारतीय संस्कार, मर्यादाचे पालन केले असून परिवाराचीही जबाबदारी तो उत्तररित्या पेलत आहे.