शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

सचिनने असेच यश मिळवत राहावे- आचरेकर

PR
PR
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतकाचा विक्रमानंतर त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याने दिवसंदिवस असेच नवीन यशाचे शिखर गाठत राहावे, असे आशीर्वाद त्यांनी सचिनला दिले आहे.

सचिन जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक करीत होतो तेव्हा आचरेकरसर मैदानावर होते. त्याची मुलगी कल्पना हिने त्यांना सचिनच्या विक्रमाबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी टीव्हीजवळ धाव घेतली होती. सचिनच्या विक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले,' मला खूप आनंद झाला आहे. सचिन आपल्या कारकिर्दीत असेच यश मिळवत राहावे. त्याने देशाचे नाव मोठे करावे, हीच माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे.'