Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 18 नोव्हेंबर 2009 (18:59 IST)
सचिनला 20 वडापाव देणार- कांबळी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने 20 वर्ष पूर्ण केली. त्यामुळे त्याला 20 वडापाव देऊन शिवाजी पार्क मैदानावरील आठवणी जाग्या करणार असल्याचे भारतीय क्रिकेट संघातील माजी फलंदाज विनोद कांबळी याने सांगितले.
बिग बॉस कार्यक्रमात असलेल्या विनोद कांबळीने सचिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात बोलताना त्याने कळत नकळत झालेल्या चुकांमुळे आपण सचिनची माफी मागत असल्याचे त्याने सांगितले. सचिनने विश्वकरंडक जिंकण्याचे आपले स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षाही कांबळीने व्यक्त केली.
कांबळी म्हणाला की, शारदाश्रम शाळेत असताना मी आणि सचिन शिवाजी पार्कच्या मैदानावर खेळत होतो. त्यावेळी सचिनच्या प्रत्येक शतकी खेळीला मी त्याला एक वडापाव खाऊ घालत होतो. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण केल्याबद्दल मी त्याला 20 वडापाव देणार आहे.