सचिनला भारतरत्न देण्याची लोकसभेत मागणी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी संसदेत करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे खासदार राजन सुशांत यांनी शून्यकाळात हा मुद्दा उपस्थित केला. सचिनने ग्वाल्हेर एकदिवसीय सामन्यात द्विशतकाचा विक्रम केला होतो. श्री. सुशांत यांनी म्हटले, की सचिनने क्रिकेटमध्ये इतिहास निर्माण केला आहे. यामुळे त्याला भारतरत्न पुरस्कार दिला गेला पाहिजे. त्याच्या नावाने संस्था सुरु करुन त्या संस्थेमार्फत युवा खेळाडूंना वार्षिक पुरस्कार देण्याची मागणीही त्यांनी केली.ग्वाल्हेर येथे एकदिवसीय सामन्यात द्विशतक केल्यानंतर प्रथमच सचिनला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी सर्वस्तरातून होऊ लागली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही सचिनची भारतरत्नसाठी शिफारस करणार असल्याचे सांगितले. शिवसेनेनेही सचिनला भारतरत्न मिळावे ही मागणी केली आहे.