गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By

साईबाबांनी दसर्‍याला का घेतली समाधी ?

साईबाबांच्या दसर्‍याला समाधी घेण्यामागे काय रहस्य आहे? यापूर्वी त्यांनी रामविजय प्रकरण का ऐकले? या प्रकरणात कथा आहे की रामाने रावणाशी 10 दिवसापर्यंत युद्ध केले आणि दशमीला रावणाचा मृत्यू झाला. रावण दहनामुळे दशमीला दसरा म्हणतात. या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता म्हणून याला विजयादशमी असे म्हणतात. चला जाणून घ्या की साईबाबांनी दसर्‍याला समाधी का घेतली.
 
शिरडी, महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहटा तहसिलाचा एक कस्बा आहे. येथे विश्‍व प्रसिद्ध संत साईबाबांनी समाधी घेतली. जगभरातून येथे भक्त साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात. साईबाबांनी 15 ऑक्टोबर दसर्‍याच्या दिवशी 1918 साली समाधी घेतली होती.
 
समाधी सव्वा दोन मीटर लांब आणि एक मीटर रुंद आहे. समाधी मंदिराव्यतिरिक्त येथे द्वारकामाई मंदिर चावडी आणि ताजिमखान बाबा चौकावर सांईं भक्त अब्दुल्लाची झोपडी आहे. वयाच्या 16 व्या वर्षी साई शिरडीत आले आणि येथे स्थायी झाले.
 
दसर्‍याच्या काही दिवसांपूर्वीच बाबांनी आपल्या एका भक्त रामचंद्र पाटलांना विजयादशमीला 'तात्या' चा मृत्यू होण्यासंबंधी सूचना दिली होती. तात्या बैजाबाईंचे पुत्र होते आणि बैजाबाई साईंची भक्त होती. तात्या, सांईबाबांना  'मामा' म्हणून हाक मारायचे, या प्रकारे साईबाबांनी तात्याला जीवनदान देण्याचा निर्णय घेतला.
 
27 सप्टेंबर 1918 ला सांईबाबांच्या शरीराचा तापमान वाढू लागला. त्यांनी अन्न-जल सर्व त्यागले. बाबांच्या समाधिस्त होण्याच्या काही दिवसांपूर्वी तात्यांची तब्बेयत एवढी खालावली की जिवंत राहील असे लक्षण दिसत नव्हते. परंतू त्याच्याजागी साईबाबांनी 15 ऑक्टोबर, 1918 रोजी आपले नश्वर शरीराचे त्याग केले आणि ब्रह्मलीन झाले.
 
शेवटल्या दिवशी काय केले बाबांनी?
दोन-तीन दिवसापूर्वीच सकाळपासूनच बाबांनी भिक्षाटन करणे स्थगित केले आणि मशिदीत बसून राहत असे. ते आपल्या शेवटल्या क्षणांसाठी पूर्णपणे सचेत होते म्हणूनच आपल्या भक्तांना धैर्य देत राहिले.
 
जेव्हा बाबांना वाटले की आता जाण्याची वेळ आली आहे तेव्हा त्यांनी श्री वझे यांना 'रामविजय प्रकरण' (श्री रामविजय कथासार) वाचण्याची आज्ञा केली. श्री वझे यांनी एक आठवडा दररोज पाठ ऐकवला. 
 
नंतर बाबांनी त्यांना आठी प्रहर पाठ करण्याची आज्ञा दिली. श्री वझे यांनी त्या अध्यायाची द्घितीय आवृत्ती 3 दिवसात पूर्ण केली. या प्रकारे 11 दिवस निघून गेले. पुन्हा 3 दिवस पाठ केला गेला. आता श्री वझे पूर्णपणे थकल्यामुळे त्यांना विश्राम करण्याची आज्ञा झाली. आता बाबा अगदी शांत बसले आणि आत्मस्थित होऊन अंतिम क्षणाची प्रतीक्षा करू लागले.
 
या दिवसांत काकासाहेब दीक्षित आणि श्रीमान बुटी बाबांसोबत मशीदीत वेळ घालवत असे. महानिर्वाणाच्या दिवशी आरती संपल्यावर त्यांनी सर्वांना परत जायला सांगितले. तरी लक्ष्मीबाई शिंदे, भागोजी शिंदे, बयाजी, लक्ष्मण बाला शिंपी आणि नानासाहेब निमोणकर तेथेच थांबले. शामा खाली मशीदीच्या पायर्‍यांवर बसली होती.
 
लक्ष्मीबाई शिंदे यांना 9 शिक्के दिल्यावर बाबांनी म्हटले की आता मशीदीत माझे मन लागत नाही, मला बुटीच्या पत्थरवाड्यात घेऊन चला, तेथे मी सुखपूर्वक राहीन. हेच अंतिम शब्द त्यांच्या श्रीमुखातून निघाले. या दरम्यानच बाबा बयाजींच्या शरीराकडे लटकून गेले आणि अंतिम श्वास सोडली. भागोजी यांनी बघितले की बाबांचा श्वास थांबला आहे तेव्हा त्यांनी नानासाहेब निमोणकर यांना हाक मारत ही गोष्ट सांगितली. नानासाहेब यांनी पाणी आणून बाबांच्या श्रीमुखात टाकले पण पाणी बाहेर पडले. तेव्हा त्यांनी जोरात म्हटले... अरे। देवा! बाबा समाधिस्थ झाले.