रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शरद पौर्णिमा
Written By

शरद पौर्णिमा: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेत सुपारी नक्की ठेवा

हिंदू शास्त्रात आश्विन महिन्याची पौर्णिमा अर्थात कोजागरी पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. या वर्षी पौर्णिमा 13 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. या रात्री जागृत भक्तांवर लक्ष्मी आपली कृपा करते. तर जाणून घ्या त्या गोष्टी ज्या लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि शरद पौर्णिमेच्या रात्री हे कार्य केल्याने लक्ष्मी प्रसन्न होईल.
 
देवी लक्ष्मीला सुपारी अत्यंत प्रिय आहे म्हणून पूजेत सुपारी नक्की ठेवावी. पूजा झाल्यावर सुपारीवर लाल दोरा गुंडाळून त्याचं अक्षता, कुंकू, फुलं इतर विधिपूर्वक पूजन करून तिजोरीत ठेवावी. धनाची कमी भासणार नाही.
 
शरद पौर्णिमेच्या रात्री महादेवाला खिरीचं नैवेद्य दाखवावं. पौर्णिमेला खीर खुल्या आकाशाखाली ठेवावी. नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण करावा. असे केल्याने घरात भरभराटी येते.
 
कोजागरी पौर्णिमेला चारी बाजूला चंद्र प्रकाश पसरल्यावरच लक्ष्मी पूजन केल्याने धन लाभाचे योग बनतात.
 
शरद पौर्णिमेला रात्री हनुमानासमोर चारमुखी दिवा लावावा. दिवा मातीचा असावा.