बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शरद पौर्णिमा
Written By

शरद पौर्णिमा: या प्रकारे करा लक्ष्मी पूजा

शरद पौर्णिमेला संध्याकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र धारण करावे. 
या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरी देवी लक्ष्मी, ऐरावतावर बसलेल्या इंद्र आणि बळीराजा यांची पूजा करावी.
या दिवशी लक्ष्मी देवीच्या व्रताचं संकल्प करावं.
पूजा स्थळी लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. 
विधिपूर्वक पूजा करावी. 
देवीला अक्षता, दूर्वा, लाल सूत, सुपारी, चंदन, पुष्प हार, नारळ, फळं, मिठाई अर्पित करावं.
नंतर तुपाच्या दिव्याने किंवा कापुराने देवीची आरती करावी. 
पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पित करुन व आप्तेष्टांना देऊन स्वत: सेवन करावे.
चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा.
यानंतर रात्री चंद्र दर्शन झाल्यावर तुपाचे 100 दिवे लावावे. 
दुसऱ्याच्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करावे.
अशात मध्य रात्री लक्ष्मी विचरण करत असताना आपल्यावर कृपा दृष्टी होईल.
कोजागरी व्रत केल्याने देवी प्रसन्न होते आणि धन- समृद्धी प्रदान करते. 
मृत्यूनंतर परलोकात देखील सद्गती प्रदान करते.