बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Updated : शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (12:31 IST)

महिला पिंड दान करू शकतात का?

Shraddha Paksha 2024 हिंदू धर्मात श्राद्ध आणि पिंडदानाला खूप महत्त्व आहे. श्राद्ध पक्षात पिंड दान पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. असे मानले जाते की जे लोक मृत्यूनंतर श्राद्ध आणि पिंड दान करत नाहीत, त्यांना इतर लोकांमध्ये खूप दुःख सहन करावे लागते. यामुळेच श्राद्ध पक्षादरम्यान पिंडदान हे पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जाते. पूर्वज श्राद्ध आणि पिंड दानाने प्रसन्न होतात आणि कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य, संतती आणि इतर अनेक आशीर्वाद देऊन पूर्वज जगात परततात. पिंड दान आणि श्राद्ध हे बहुतेक पुरुषच करतात. अशा परिस्थितीत महिलाही श्राद्ध करू शकतात का असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो. चला तर मग जाणून घेऊया महिला श्राद्ध करू शकतात की नाही...
 
अशा परिस्थितीत महिला श्राद्ध आणि पिंडदानही करतात
धार्मिक ग्रंथानुसार ज्या घरामध्ये पुत्र नसतात त्या घरातील महिला श्राद्ध आणि पिंड दान करू शकतात. गरुड पुराणातही याचा स्पष्ट उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीला मुलगा नसेल तर अशा स्थितीत मुली आपल्या पितरांचे श्राद्ध आणि पिंड दान करतात.
 
प्रसन्न होतात पितृ
मान्यता आहे की जर कन्या श्रद्धापूर्वक पितरांनिमित्त श्राद्ध आणि पिंडदान करते तर पितर ते स्वीकार करतात आणि आशीर्वाद देतात. कन्या व्यतिरिक्त बहिण, पत्नी देखील श्राद्ध आणि पिंडदान करु शकतात.
 
माता सीतेने राजा दशरथ यांचे पिंडदान केले होते
मान्यतेनुसार माता सीतेने राजा दशरथाचे पिंडदान केले होते. वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आहे की वनवासात भगवान श्री राम, लक्ष्मण आणि माता सीता पितृ पक्षाच्या वेळी गयामध्ये आले होते. त्यावेळी प्रभू राम आणि लक्ष्मण श्राद्धासाठी साहित्य गोळा करण्यासाठी गेले असता त्यांना साहित्य आणण्यास उशीर होत होता. दरम्यान माता सीतेने राजा दशरथांना पाहिले. राजा दशरथने माता सीतेकडे पिंडदानाची विनंती केली होती.
 
यानंतर माता सीतेने वट वृक्ष, केतकी फुलं आणि फल्गु नदी यांना साक्षी ठेवत वाळूचे पिंड तयार केले आणि राजा दशरथ यांचे पिंडदान केले. सीता मातेच्या या दानामुळे राजा दशरथ प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला.
 
पिंडदान करताना महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
श्राद्ध करताना महिलांनी पांढरे आणि पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत.
धार्मिक मान्यतेनुसार केवळ विवाहित महिलांनीच श्राद्ध करावे.
तर्पण अर्पण करताना महिलांनी लक्षात ठेवावे की कुश, पाणी आणि काळे तीळ घालून तर्पण अर्पण करू शकत नाही.
श्राद्धाची तिथी आठवत नसेल तर नवमीला वृद्ध स्त्री-पुरुष आणि पंचमीला लहान मुलांचे श्राद्ध करावे.