गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

पितृपक्षात पितरांना का वाढतात खीर, जाणून घ्या!

shradha paksha
पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध करताना त्यांना खीर तर्पण करण्याची मान्यता आहे. याचे खास कारण असे आहे की जेव्हा आमच्या येथे कोणता पाहुणा येतो त्याला पाहुणचार म्हणून गोड पदार्थ खाऊ घालतो. मिठाईसोबत भोजन अतिथीला पूर्ण तृप्ती देतो. अशी मान्यता आहे की जेव्हा पितरांना भोजन तर्पण करतो तेव्हा त्यांनी खीर नक्की देतो. मनोवैज्ञानिक भाव असा देखील आहे की श्राद्धाच्या जेवणात खीर बनवून आम्ही पितरांप्रती आदर-सत्कार प्रदर्शित करतो. श्राद्धात खीर बनवण्याच्या मागचे एक कारण असे ही आहे की श्राद्ध पक्षाअगोदर पावसाळा असतो. आधीच्या काळात पावसाळ्यात अधिकतर लोक  व्रत आणि उपास करत होते. अत्यधिक व्रत केल्याने त्यांचे शरीर कमजोर होऊन जात होते आणि श्राद्धाच्या 16 दिवसांमध्ये खिरीचे सेवन केल्याने त्यांचे शरीर परत मजबूत होत होते. या परंपरेमुळे श्राद्ध पक्षाच्या 16 दिवसांमध्ये पितरांना खीर तर्पण करण्याची परंपरा आहे.