रविवार, 27 नोव्हेंबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated: मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (16:10 IST)

श्रावणाच्या पंचमी ला बांधला ग झुला

shrawan sari
श्रावणाच्या पंचमी ला बांधला ग झुला,
दोरीवर झुलते मी, थांबवू नकोस तू मला,
करीन वाऱ्याशी गुजगोष्टी, खेळीनं मी झिम्मा,
गीत ओठावर येते, हा श्रावणाचा महिमा.
झाली गर्द झाडी, सर्वच कसं हिरवंगार,
सुखावला बळीराजा, फुटले धरातून अंकुर,स्वप्न साकार
येईल जोमाने पिकं, होईल सुकाळ,
धन्य होईल बळीराजा, फिटेल दुःखाचा हा काळ!
करू सणवार साजरे, येऊ एकत्रित आप्तगण,
गाऊ गीत आनंदाचे, त्यासाठीच असतात सण!
...अश्विनी थत्ते