Shiv Mandir: हे शिवमंदिर भाविकांना दर्शन दिल्यानंतर गायब होते, शिवपुराणात ही उल्लेख!

stambheshwar mahadev
Last Modified मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (17:18 IST)
शिवमंदिरांना भेटी देणे, श्रावण महिन्यात प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देणे खूप फलदायी आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात देशातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. यातील अनेक मंदिरे प्राचीन आहेत आणि त्यांच्याशी निगडित रहस्यांमुळे जगभरातून लोक त्यांना भेटायला येतात. गुजरातमधील वडोदरा येथे असेच एक जगप्रसिद्ध मंदिर आहे, जे दररोज गायब होते आणि पुन्हा प्रकट होते. हा रोमांचक कार्यक्रम पाहण्यासाठी येथे दररोज मोठ्या संख्येने लोक येतात.

हे शिवमंदिर समुद्रात वसलेले आहे
भगवान शंकराचे हे प्रसिद्ध मंदिर,स्तंभेश्वर महादेव मंदिर समुद्रात आहे.या मंदिराची स्थापना भगवान शिवपुत्र कार्तिकेयाने केली असे मानले जाते. समुद्राच्या आत असलेले हे मंदिर दिवसातून दोनदा पाण्यात बुडते आणि नंतर ते दिसू लागते. खरे तर दररोज या समुद्रातील पाण्याची पातळी इतकी वाढते की मंदिर पाण्याखाली जाते आणि नंतर पाण्याची पातळी कमी झाल्यावर मंदिर पुन्हा दिसू लागते. ही घटना दररोज सकाळी आणि संध्याकाळी घडते.
stambheshwar mahadev
महासागर शिवाचा करतो अभिषेक
शिवमंदिर समुद्रात बुडून पुन्हा प्रकट होण्याच्या या घटनेला भक्तांनी समुद्रात केलेला शिवाचा अभिषेक म्हणतात. जेव्हा समुद्राची पातळी वाढू लागते तेव्हा काही काळासाठी भाविकांचा मंदिरात प्रवेश बंद केला जातो. स्कंद पुराण आणि शिवपुराणातील रुद्र संहितेत, स्तंभेश्वर मंदिराविषयी असे म्हटले आहे की ताडकासुर राक्षसाने कठोर तपश्चर्या करून शिवाकडून वरदान घेतले होते की केवळ शिवाचे पुत्रच त्याचा वध करू शकतात. यानंतर केवळ 6 दिवसांच्या कार्तिकेयाने तडकासूरचा वध करून लोकांना तडकासूनच्या प्रलयातून मुक्त केले. यानंतर ज्या ठिकाणी राक्षसाचा वध करण्यात आला त्याच ठिकाणी हे शिवमंदिर बांधण्यात आले. या मंदिराचा शोध सुमारे 150 वर्षांपूर्वी लागला आहे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Raksha Bandhan Wishes In Marathi 2022 रक्षाबंधनाच्या ...

Raksha Bandhan Wishes In Marathi 2022 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो, फुगलो तरी त्यात ...

Raksha Bandhan 2022 Katha रक्षाबंधन पौराणिक कथा

Raksha Bandhan 2022 Katha रक्षाबंधन पौराणिक कथा
रक्षाबंधन हा सण भाऊ-बहीण यांच्यातील प्रेम दर्शवतं. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी रक्षाबंधन ...

फूलों का तारों का सबका कहना है Rakhi Song

फूलों का तारों का सबका कहना है Rakhi Song
फूलों का तारों का सबका कहना है... हे हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटातील लोकप्रिय गाणे ...

Raksha Bandhan 2022 Shubh Muhurt रक्षाबंधन 2022 शुभ मुहूर्त

Raksha Bandhan 2022 Shubh Muhurt रक्षाबंधन 2022 शुभ मुहूर्त
रक्षाबंधन 2022 शुभ मुहूर्त 11 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजे नंतर राखी बांधता येईल. जर तुम्ही ...

Raksha Bandhan 2022: रक्षा बंधन सणाला चुकुन करु नये हे 20 ...

Raksha Bandhan 2022: रक्षा बंधन सणाला चुकुन करु नये हे 20 कामे
हिंदू दिनदर्शिकेनुसार, रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. ...

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...