बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By

श्रावण विशेष : मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, फुगडी आणि त्याचे प्रकार

fugadi
श्रावण महिन्यात मंगळागौरी हा हिंदू धर्मातील व्रत वैकल्य आहे.मंगळागौरीची पूजा नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतरच्या 5 वर्ष प्रत्येक मंगळवारी करायची असते.सर्व काही मंगल होवो घरात सुख संपन्नता नांदो,गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करून सर्व काही मंगळदायी होवो या साठी ही पूजा केली जाते.

5 वर्षांनंतर मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन केले जाते.आई वडिलांना वाण देऊन या व्रताची सांगता केली जाते. या व्रताला मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळतात.गाणी म्हणतात. हे खेळ आपल्या संस्कृतीची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी तसेच शरीराचा व्यायाम होण्यासाठी खेळले जाते. या मध्ये फुगडी हे लोकप्रिय खेळ आहे. शरीराला चपळता देण्यासाठी फुगडी करतात.धार्मिक आणि सामाजिक प्रसंगी फुगडी करतात. 
फुगडी हा एक कलाचा प्रकार आहे हा महाराष्ट्रात आणि गोव्याच्या परंपरेला जपून ठेवतो. 
 
फुगडी करताना स्त्रिया विविध प्रकारची रचना करतात आणि गाणी म्हणतात.वर्तुळाकार किंवा पंक्तीमध्ये या फुगड्या करतात.या खेळात कोणत्याही वाद्यांची गरज नसते स्त्रिया गाणं म्हणतात आणि खेळणाऱ्या बायका तोंडाने फु फु असा आवाज करतात. या खेळाची सुरुवात देवीला आवाहन करून केली जाते. सुरुवातीला या खेळाची गती मंद असते नंतर वेग येतो. दोन ते आठ स्त्रिया मिळून फुगडी खेळतात. 

फुगडीचे अनेक प्रकार आहे जसे की -
साधी फुगडी, गवळण फुगडी,वटवाघूळ फुगडी,बस फुगडी,तवा फुगडी,फिगरी फुगडी,वाकडी फुगडी,कासव फुगडी, भुई फुगडी,दंड फुगडी,एकहाती फुगडी,फुलपाखरू फुगडी,पद्मासन फुगडी,चौफुला फुगडी,हात फुगडी,जाते फुगडी, उठबस फुगडी,कुलूप किल्ली फुगडी,केरसुणी फुगडी,त्रिफुला फुगडी,नखुल्या फुगडी,जातं फुगडी, हे सर्व खेळ शारीरिक व्यायामासाठी चांगले असतात.
Edited by - Priya Dixit