रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (12:19 IST)

Varalakshmi Vrat 2024 श्रावणात वरदलक्ष्मी व्रत पूजा पद्धत

श्रावणात अनेक सण साजरे केले जातात. यापैकी एक ‘वरलक्ष्मी व्रत’ (Varalakshmi Vrat 2024) असे आहे। वर देणारा वरलक्ष्मी व्रत श्रावण महिन्यातील शुक्रवारी साजरा करण्याची पद्धत आहे. यंदा हे व्रत 16 ऑगस्ट शुक्रवारी आहे. तसं तर शुक्रवार हा वार देवी लक्ष्मीला समर्पित आहे परंतु श्रावणातील वरदलक्ष्मी व्रत आराधना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
वरदलक्ष्मी व्रत केल्याने अखंड सौभाग्य, सुख-समृद्धी आणि सुख जीवानचे वरदान मिळते. तर चला जाणून घेऊया वरदलक्ष्मी व्रत तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजन विधी-
 
वरदलक्ष्मी व्रत तिथी
पंचांगानुसार यंदा वरदलक्ष्मी व्रत 16 ऑगस्ट 2024 रोजी ठेवला जाईल. हे व्रत सवाष्ण स्त्रिया करता. या दिवशी लक्ष्मीपूजनाचे विधान आहे.
 
वरद लक्ष्मी व्रत शुभ मुहूर्त
16 ऑगस्ट रोजी पाळल्या जाणाऱ्या वरद लक्ष्मी व्रताचा शुभ मुहूर्त या दिवशी पहाटे 5:57 ते 8:17 पर्यंत असेल. सिंह राशीत हा शुभ काळ असेल. या दिवशी वृश्चिक राशीचा पूजा मुहूर्त 12:50 ते 3:08 पर्यंत असेल. कुंभ लग्न पूजेचा मुहूर्त 6:55 ते 8:22 पर्यंत असेल. वृषभ लग्न पूजेचा मुहूर्त 17 ऑगस्ट रोजी दुपारी 11:22 ते 1:08 पर्यंत असणार आहे.
 
वरदलक्ष्मी व्रत पूजा विधी
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादिने निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
यानंतर देवघर आणि पूजा स्थळ गंगाजलाने शुद्ध करावे.
नंतर एका चौरंगावर लाल कापड पसरवून त्यावर देवी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती स्थापित करावी.
नंतर हातात पाणी घेऊन व्रत संकल्प करावे आणि पूजा सुरु करावी.
पूजा करताना देवाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला थोडे तांदूळ ठेवावे आणि त्यावर पाण्याने भरलेले भांडे ठेवावे.
नंतर कलशावर कलावा बांधून स्वास्तिक काढावे.
देवी लक्ष्मी आणि गणपतीला शेंदूराचे तिलक लावावे.
फुलं-हार अर्पित करुन तुपाचा दिवा लावावा.
नंतर वरलक्ष्मीला सवाष्णीचे साहित्य अर्पित करुन नैवेद्य दाखवावा.
वरलक्ष्मी व्रत कथा वाचावी आणि आरती करावी.
पूजा संपल्यावर कुटुंबातील सदस्यांना प्रसाद वाटप करावा.
 
वरदलक्ष्मी व्रत महिमा
सनातन धर्मात वरलक्ष्मी व्रताला खूप महत्त्व आहे. वरदलक्ष्मी व्रताला इच्छापूर्ती व्रत म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पाळल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. वरलक्ष्मी हे माता लक्ष्मीचे रूप आहे आणि शुक्रवार माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या व्रताच्या दिवशी वरलक्ष्मीचे पूजन योग्य रीतीने केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन धन-धान्य यांचा आशीर्वाद देते. या व्रतामुळे घरात सुख-समृद्धी येते.