शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. शीख
  4. »
  5. शिखांचे सण
Written By वेबदुनिया|

गुरूपर्व

शीख धर्मात 10 गुरू होऊन गेले. त्यांच्या जन्मदिनी गुरूपर्व साजरा केला जातो. विशेषतः गुरू नानक, गुरू गोविंदसिंग, गुरू अर्जुनदेव व गुरू तेगबहाद्दूर यांचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात. 'गुरू ग्रंथसाहिब'चे सलग 48 तासात वाचन काही जण करतात. नवे कपडे घालून गुरूद्वारात जातात. गुरूव्दारा या दिवशी सजविण्यात येतो. मिरवणूकही काढली जाते.

त्यात शारिरिक कसरती केल्या जातात. पारंपरिक धार्मिक गाणी गायली जातात. या दिवशी गुरूद्वारात जेवण दिले जाते. त्याला लंगर म्हणतात.