1. धर्म
  2. हिंदू
  3. सिंहस्थ 2016
Written By

श्री सिद्धवट मंदिर (शक्तीभेद तीर्थ)

क्षिप्राकाठी प्राचीन सिद्धवट स्थळ शक्तीभेद म्हणूनही ओळखलं जातं. हिंदू पुराणांनुसार चार वटवृक्षाचे महत्त्व आहे. उज्जैन येथील सिद्धवट हे अक्षयवट (प्रयाग), वंशीवट (वृंदावन), आणि बौधवट (गया) प्रमाणेच पवित्र आहे. 
 
सिध्दवट घाटावर अंत्येष्टी संस्कार संपन्न करण्यात येतात. स्कन्द पुराणाप्रमाणे याला प्रेत-शिला-तीर्थ असेही म्हटले आहे. देवी पार्वती यांच्याद्वारे लावलेल्या या वटवृक्षाची शिव रूपात पूजा केली जाते. येथेच कार्तिक स्वामींना सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आले असून तारकासुर असुराचा वधही येथेच झाला आहे.
 
संतती, संपत्ती आणि सद्गती या तीन प्रकारच्या सिद्धीसाठी येथे पूजा केली जाते. संतती अर्थात अपत्य प्राप्तीसाठी येथे उलट स्वस्तिक चिन्ह मांडण्यात येतं. संपत्तीसाठी वृक्षावर रक्षा सूत्र बांधलं जातं. तसेच सद्गती अर्थात पितरांसाठी येथे अनुष्ठान केलं जातं. येथे कालसर्प दोषाचे निवारणही केले जातात.
 
सिध्दवटाच्या काठावर अनेक कासव दिसतात. असे म्हणतात की मुगल काळात हे झाड नष्ट करण्याचे प्रयत्न केले गेले होते. हे कापून लोखंडी तवे जडले होते पण हे वृक्ष लोखंड फोडून पुन्हा हिरवागार झाले.