मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सिंहस्थ 2016
Written By

सिंहस्थमध्ये तांबूल दानाचे महत्त्व

तांबूल दान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो. तांबूल खाण्याने पाप लागतं तसेच तांबूल दान केल्याने त्या पापापासून मुक्ती मिळते. पान, पानाचे नाडी तंटू, चुना आणि रात्री कात खाण्याने पाप लागतं आणि मनुष्याला दारिद्र्य भोगावं लागतं.
 
या पाप आणि दारिद्र्यापासून मुक्तीसाठी तांबूल दान करायला हवं. सिंहस्थात येणार्‍या यात्रेकरूंना हे दान विधिपूर्वक केले पाहिजे. यासाठी मकर संक्रांती, मौनी अमावस्या, पंचमी, पौर्णिमा आणि कुंभ संक्रांती शुभ दिवस मानले आहेत. हे दान करण्यासाठी भक्ताने आपल्या सामर्थ्यांप्रमाणे सोनं, चांदी, तांब किंवा पितळ्याचे पानदान तयार करायला हवे.
 
संपन्न भक्ताने सोन्याचे पान, चांदीची सुपारी, बैदूर्याचे कात आणि मोती ठेवून दान करावे. पानाची संख्या एक हजार असावी. त्याऐवजी, शंभर सुपार्‍या, कात आणि चुनाही वापरण्यात येतो. सामान्य भक्त जडासकट पान पानदानात ठेवतात. त्यात जावीतरी, लवंगा, वेलची आणि अडकित्ता ठेवतात. त्यावर रंगीत कापड झाकून पत्नीसह ब्राह्मणाला दान करतात.
दान देताना म्हणतात- ब्राह्मण श्रेष्ठ, सर्व वस्तूंसोबत मी तांबूल आपल्याला देत आहेत, मला पापातून मुक्त करा. मी पान, चुना आणि रात्री कात खाल्ला आहे. गल्ली, टपरी, रस्ता, अग्निहोत्र वाले घर, मंदिर अ‍ाणि बिछान्यावर मी जे पान खाल्ले आहेत, त्यामुळे पाप घडला आहे. ते पाप नष्ट होऊन वेणीमाधव माझ्यावर प्रसन्न राहो.
 
उज्जैन येऊन जे भक्त या प्रकारे तांबूल दान करतात, त्यांचे पाप नष्ट होतात. हे दान केल्याने आयू- आरोग्य, सौभाग्य, पुत्र-पौत्र आणि धन प्राप्ती होते. जे दान करण्यात अक्षम असतील त्यांनी केवळ सुपारी आणि फळ ब्राह्मणाला दान करावे.