रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (20:14 IST)

दक्षिण भारतीय शैलीतील राजमा भात.

ही एक चविष्ट रेसिपी आहे. ज्याला राजमा, कांदा, हिरव्या मिरच्या, तिखट, मसाले आणि तुळशीची पाने घालून तयार करून भातासह सर्व्ह करतात. हे बनविण्यासाठी खूप सोपं आहे आणि चविष्ट आहे. चला तर मग दक्षिण भारतीय शैलीतील ही रेसिपी कशी बनवायची त्याचे साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य-
175 ग्राम भात पाणी काढलेला शिजवलेला भात,4 चमचे तेल,1 हिरवी ढोबळी मिरची बारीक चिरलेली, 1 लाल ढोबळी मिरची बारीक चिरलेली, 2 कांदे बारीक चिरलेले, 2 हिरव्या मिरच्या डी-सीड चिरलेली, 3 टोमॅटो चिरलेले, 100 ग्रॅम राजमा शिजवलेला, 1 चमचा ताजा तुळशीचे पाने, 1 चमचा ओवा,1 लहान चमचा चिली फ्लॅक्स, 1/2 चमचा लसूण पूड,1/2 लहान चमचा काळीमिरपूड, 1/2 लहान चमचा कोरडी कांदा पूड, मीठ चवी प्रमाणे.
 
कृती- 
एका पॅनमध्ये तेल तापत ठेवा. कांदा, लाल ढोबळी मिर्ची, आणि हिरवी ढोबळी मिरची मऊ होई पर्यंत परतून घ्या. हिरवी मिरची आणि टोमॅटो घाला आणि 2 मिनिटे शिजवून घ्या. राजमा आणि भातासह सर्व मसाले आणि हर्ब्स घाला. चांगले मिसळा तुळशीच्या पानाने सजवा आणि गरम राजमा भात सर्व्ह करा.