गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

व्हेज उत्तपम

ND
साहित्य : 2 कप तांदूळ, 1 कप धुतलेली उडदाची डाळ, 1 चमचे मीठ, 2 बटाटे, 1 कांदा, 1 फूलकोबी, अर्धी वाटी मटर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने, अर्धा चमचा तिखट, थोडे हिंग, अर्धा चमचा जिरं, इच्छेनुसार तूप.

कृती : रात्रीच तांदूळ आणि डाळ वेगवेगळी भिजून ठेवावी. सकाळी दोन्ही एकत्र वाटून घ्यावी आणि थोडे-थोडे पाणी टाकावे. मीठ टाकून उन्हात ठेवावे. ज्यावर खमीर येईल. बटाटे कढईत टाकून त्यावर तूप घालून हिंग आणि जिरे टाकावे. कोरडे मसाले टाकून सर्व भाज्या एकत्र मिसळाव्या आणि शिजायला ठेवावे. लक्ष ठेवावे की भाजी एकदम सुकलेली झाली पाहिजे. नंतर तांदूळ आणि डाळीचे मिश्रण तव्यावर गोल पसरवून शेकावे. मिश्रण जास्त पातळ व्हायला नको. जेव्हा पूर्ण शेकल्यावर मधोमध भाजी टाकून पुडीसारखे बंद करावे आणि आच मंद करून कुरकुरीत होईपर्यंत शेकावे.