1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

पिंकीला फसविण्यात माजी अ‍ॅथलिटच्या पतीचा हात

PR
आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी माजी धावपटू पिंकी प्रामाणिकला फसविण्यात माजी महिला खेळाडू ज्योतिर्मय सिकंदरचा पती अवतार सिंगचा हात असल्याचे उघड झाले आहे. पिंकी ही पुरुष असून, तिने आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप करणार्‍या विधवा महिलेनेच हा खुलासा केला आहे. अवतार सिंग आणि पिंकीदरम्यान एका भूखंडावरून वाद सुरू होता. यासंदर्भात अवतार सिंगने आपल्यासोबत फोनवर चर्चा केल्याचा पुरावाही या विधवा महिलेने सादर केला आहे.

पिंकीची 'लिव्ह इन पार्टनर' राहिलेली ही महिला म्हणाली, की पिंकीकडून भूखंड बळकावण्यासाठीच अवतार सिंगने हा कट रचला होता. या भूखंडावर अवतारला एक इमारत बांधायची होती, परंतु त्यावरून पिंकी आणि अवतारदरम्यान हा वाद सुरू झाला.