1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 2 मार्च 2009 (16:58 IST)

कामात गोंधळ घालू नका रे....

मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा सल्ला

2010 मध्ये राजधानीत होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कामात दिरंगाई सुरू असल्याचे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मान्य केले आहे. काही गोष्टी अशा आहेत की, त्या ठरलेल्या वेळत अजूनही पूर्ण झालेला नाहीत. परंतु आयोजकांनी अधिक गोंधळ करू नये, असा त्यांनी फुकटचा सल्ला दिला आहे.

इंडियन प्रिमियर लीगचा दिल्ली डेयरडेविल्स संघाच्या क्लबच्या शुभारंभाप्रसंगी मुख्यमंत्री शीला दीक्षित बोलत होत्या. दीक्षित यांनी सांगतिले की, राष्ट्रकुल स्पर्धेच्या काही कामात दिरंगाई दिसून येत आहे तर काही कामे वेळवर होत आहे.

स्पर्धा सुरू होण्यासाठी अजून दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असून कामे नियोजित वेळत पूर्ण होतील असा मुख्यमंत्री यांनी विश्वास व्यक्त केला आहे. कामाची जबाबदारी देण्यात आलेल्या संस्था व सरकार यांच्यात योग्य पध्दतीने समन्वय साधला जात आहे.