1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

केव्हिटोव्हाला 'न्यू हेवन'चे विजेतेपद

WD
झेक प्रजासत्ताकाची 'स्टार' टेनिसपटू पेट्रा केव्हिटोव्हाने रशियाच्या मारिया किरिलेंकोला पराभूत करून न्यू हेवन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. शनिवारी रात्री खेळण्यात आलेल्या या सामन्यात केव्हिटोव्हाने किरिलेंकोला 7-6, 7-5 असे परभूत केले.

केव्हिटोव्हाचे हे तीन आठवड्यंनी दुसरे विजेतेपद ठरले. स्पर्धेचे दुसरे मानांकन असलेली पेट्रा केव्हिटोव्हा पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला 5-2 अशी माघारली होती. त्यानंतर तिने सलग पाच गेम जिंकत हा सेट आपल्या नावे केला. त्यानंतर पुढच्या सेटमध्येही चित लय कामय राखत केव्हिटोव्हाने लंडन ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत किरिलेंकोकडूनच झालेल्या पराभवाची परतफेडही केली.