1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: लंडन , सोमवार, 4 जुलै 2011 (12:31 IST)

जोकोविच विंबल्डन विजेता

नोवाक जोकोविचने रॅफेल नदालचा पराभव करून विंबल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले. त्याने प्रथमच ही स्पर्धा जिंकून या स्पर्धेतील नदालची सद्दी संपवली. नदाल 2007 पासून या स्पर्धेत अपराजित आहे.

जोकोविचने अंतिम लढत जिंकत या वर्षातील आपली आगेकूच कायम राखली. या वर्षातील नदालविरुद्धची पाचवी लढत जिंकली; तसेच ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला सर्बियन खेळाडू ठरला.

'आजचा दिवस अविस्मरणीय आहे. ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. जगातील सर्वोत्तम खेळाडू असलेल्या रॅफेल नदालला मी ग्रास कोर्टवर हरविले आहे, म्हणजे माझा खेळ नक्कीच सर्वोत्तम झाला असेल', असे जोकोविचने सांगितले.