नदाल - नोव्हाक उर्वरित लढत आज होणार

nadal  novahak
पॅरिस| वेबदुनिया|
WD
फ्रेंच ओपनच्या अजिंक्यपदासाठी सुरू असलेल्या राफेल आणि जाकोव्हिच थरारक झुंजीत पावसाने खोडा घातला. त्यामुळे आज थांबलेली लढत सोमवारी खेळवली जाणार आहे. पावसामुळे दुसर्‍यांदा खेळ थांबला तेव्हा नदालने दोन तर नोव्हाकने एक सेट जिंकला होता. चौथ्या सेटमध्ये नोव्हाक २-१ असा आघाडीवर असताना पुन्हा पावसाचे आगमन झाले. पहिल्यांदा पाऊस आला तेव्हा नदालने पहिला सेट ६-४ जिंकला होता आणि दुसर्‍या सेटमध्ये ५-३ ने आघाडीवर होता. खेळ सुरू झाल्यानंतर नदालने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

पण, जिगरबाज नोव्हाकने थक्क करणारी मुसंडी मारली. पावसामुळे नदालची एकाग्रता भंग झाल्याचा पुरेपूर फायदा घेत तिसरा सेट ६-२ असा सहज खिशात घातला.

नदाल जिंकल्यास त्याचे हे फ्रेंच ओपनचे सातवे अजिंक्यपद ठरेल. तर नोव्हाक सलग चौथ्या ग्रॅण्डस्लॅमसाठी उत्सुक आहे.
क्ले कोर्टवर तुफानी खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या नदालने पहिल्या सेटमध्ये अपेक्षेप्रमाणे वर्चस्व राखले. नोव्हाकने केलेल्या तब्बल २७ चुका नदालच्या पथ्यावर पडल्या. त्या तुलनेत नदालने फक्त १७ चुका केल्या. दोघांनी विनर मात्र सारखेच म्हणजे २0-२0 ठोकले. दुसर्‍या सेटमध्येही नदालने आपली तुफानी घोडदौड कायम राखली. हा सेट जिंकला असता तर नदालचे अजिंक्यपद नक्की झाले असते.
तत्पूर्वी, पहिल्या दोन सेट नदालने आराम खिशात घातले. आपल्या वेगवान खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या नदालने पहिल्याच सेटमध्ये ३-0 अशी खणखणीत आघाडी घेतली. ४-0 अशी आघाडी घेण्याचीही त्याला संधी होती. पण फोरहँण्डचे काही शॉट त्याने चुकवले आणि त्याचा फायदा घेत नोव्हाकने एक पाँइंट जिंकला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५
देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण ...

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता
महाराष्ट्रात अद्यापही केव्हाही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज, २९ मार्च ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत ...

करोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर
कोरोनाशी लढा देण्यासाठी उद्योग जगताकडूनही मोठा आर्थिक हातभार लागत आहे. काही कलाकारांनीही ...

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट शक्य
येत्या आठवड्यापासून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना टेस्ट ची सोय उपलब्ध असणार आहे. ...

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी

देशात अशी सुरु आहे कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी
सध्या भारतात कोरोनाचे संकट गडद होऊ लागले आहे. शनिवारी देशभरात एकूण कोरोनाग्रस्त रुग्नांची ...