शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

विम्बल्डनमधून कमाईचा विक्रम

PR
यंदा जून महिन्यात झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतून विक्रमी कमाई झाल्याचे ब्रिटिश टेनिस महासंघाने घोषित केले आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतून बहासंघाला तब्बल 3 कोटी 78 लाख पौंडचा नफा झाला आहे.

गेल्या तीन वर्षांत ब्रिटिश टेनिस महासंघाने खेळाडूंच्या विकासावर 1 कोटी 23 लाख तर प्रेक्षकांसाठी प्रोत्साहनपर योजनेवर 1 कोटी 70 लाख पौंड्‍सचा खर्च केला आहे. अॅन्डी मरेने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण आणि अमेरिकन ओपन जिंकल्यावर ब्रिटनमध्ये नव्या जोमाने टेनिसचा प्रचार महासंघाने सुरू केला आहे.