रविवार, 5 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (22:34 IST)

Bajrang Punia Wins Gold:बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये कॅनडाच्या कुस्तीपटूचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले

Bajrang Punia Wins Gold medal in wrestling
CWG 2022, Bajrang Punia Wins Gold: भारताच्या बजरंग पुनियाने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली. बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या कुस्तीपटूला हरवून सुवर्णपदक जिंकले. 
 
भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. त्याने फ्रीस्टाइल 65 किलो गटात कॅनडाच्या लचलान मॅकनीलचा 9-2 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. बर्मिंगहॅममधील कुस्तीतील भारताचे हे पहिले आणि एकूण सहावे सुवर्णपदक आहे. 
 
बजरंगने यापूर्वी 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. यावेळचे कुस्तीतील भारताचे हे दुसरे पदक आहे. बजरंगच्या आधी अंशू मलिकने रौप्य पदक जिंकले होते.
 
यापूर्वी भारताच्या अंशू मलिकने 57 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. मात्र, अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकण्यापासून ती हुकली. या स्पर्धेत नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोयेने सुवर्णपदक पटकावले.