रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (12:04 IST)

कुस्तीपटू बजरंग पुनिया यांना जीवे मारण्याची धमकी, परदेशी नंबर वरून आला मॅसेज

देशातील आघाडीचे कुस्तीपटू आणि नुकतेच काँग्रेसमध्ये सामील झालेले बजरंग पुनिया यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यावर त्यांना व्हॉट्सॲप वर धमकीचा मॅसेज आला त्यात काँग्रेस पक्ष सोडायला सांगितले. त्यात लिहिले "काँग्रेस पक्ष सोडा नाही तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी चांगले नाही. तुम्हाला पाहिजे तिथे तक्रार करा. ही आमची पहिली आणि शेवटची चेतावणी आहे. 

धमकी मिळाल्यावर बजरंग पुनिया यांनी सोनिपत बहलगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास सुरु केला. ते म्हणाले, धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी आवश्यक पाऊले घेत आहोत. बजरंग पुनियांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त केला आहे.या धमकीमुळे लोकांमध्ये चिंता आणि संताप निर्माण होत आहे. 
Edited by - Priya Dixit