मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (13:56 IST)

महाराष्ट्रातील दिव्यांग दिलीप गावित ने दोन पदके जिंकली,खेळाडूचे सर्वत्र कौतुक

फोटो साभार -सोशल मीडिया 
सध्या नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम वर 20 वर्ष खालील मुलांची राष्ट्रीय खुली 400 मीटर अजिंक्यपद स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताच्या कान्याकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले आहे.या मध्ये महाराष्ट्रातील दलीप गावित यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अपंगावर मात देत दोन पदके जिंकून सर्वांची मनें जिंकली आहे. 
दिलीप गावित, पुणे महाराष्ट्रातील एक अपंग खेळाडू, त्याने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत दोन पदके जिंकली. 17 वर्षीय दिलीपने यापूर्वी राज्य चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याच्या एक हात नाही तरीही तो खचला नाही आणि त्याने अपंगत्वावर मात देऊन उत्तम कारकिर्दी केली.त्याच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.दलिपची ही पहिलीच स्पर्धा नसून त्याआधी ही त्याने अनेक स्पर्धेत पदके पटकावली आहे.महाराष्ट्र संघाकडून रोप्य आणि कांस्य पदक मिळवले आहे.पेरा ऑलम्पिक स्पर्ध्ये मध्ये  T 46 गटाच्या ट्रायल साठी गेला होता पण त्यात पात्रता गाठता आले नाही. या खेळात भोपाळच्या मनीषा कीरने आपले दुसरे सुवर्णपदक पटकावले.
 
पुण्यातील जा गेम्समध्ये रविवारी मुलांच्या 4x100 मीटर रिलेमध्ये दिलीपने महाराष्ट्र संघासाठी कांस्यपदक जिंकले. यानंतर महाराष्ट्राच्या संघाने 4x200 मीटर रिले स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. दिलीप पदक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. येथे भोपाळच्या मनीषा कीरने आपले दुसरे सुवर्णपदक जिंकले. ट्रॅप मिश्रित जोडी स्पर्धेत हे पदक मिळाले.