शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मॉंट्रियल , शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (16:27 IST)

टेनिसच्या राजकारणात फेडरर व नदाल सहभागी

Federer and Nadal participate in the politics of tennis
भलेही टेनिसच्या मैदानावर एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले रॉजर फेडरर व राफेल नदाल हे असोसिएशन ऑफ टेनिस प्लेअर्सच्या समितीवर काम करणार आहेत. या दोन्ही खेळाडूंची या संघटनेवर नुकतीच निवड करण्यात आली आहे. नदाल हा येथे सुरू असलेल्या मॉंट्रियल स्पर्धेत सहभागी झाला आहे.
 
त्याने सांगितले की, आम्हा दोघांनाही व्यावसायिक टेनिसचा भरपूर अनुभव आहे. युवा खेळाडूंच्या विकासाकरिता या संघटनेवर आम्ही काही कार्य करावे अशी अनेक युवा खेळाडूंची इच्छा आहे. संघटनेवरील रॉबिन हास, जेमी मरे यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला असून त्यांच्या जागी आम्हा दोघांची निवड झाली आहे. आम्ही मैदानावर जरी प्रतिस्पर्धी असलो तरी मैदानाबाहेर फेडरर माझा जिवलग मित्र आहे. त्यामुळेच त्यानेही संघटनेवर काम करण्यास त्वरीत मान्यता दिली.
 
फेडररने सांगितले की, संघटनेबाबत खेळाडूंच्या अनेक समस्या आहेत. त्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. नदालबरोबर असल्यामुळे संघटनेवर काम करण्यास मजा येणार आहे.