गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (11:56 IST)

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

भारताचे माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन.त्यांच्या निधनानंतर क्रीडा जगात शोककळा पसरली आहे.नाटेकर आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद जिंकणारे भारताचे पहिले बॅडमिंटनपटू होते. 
 
भारताचे माजी महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी जगाला निरोप दिला.नंदू हे भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकणारे पहिले बॅडमिंटनपटू होते.1956 साली त्यांनी ही कामगिरी केली. त्यांच्या निधनानंतर क्रीडा जगात शोककळा पसरली आहे. 
 
बॅडमिंटन कारकीर्दीत नंदू नाटेकरने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरी गाठली.या व्यतिरिक्त त्यांनी 6 वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले.1961मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते भारताचे  पहिले बॅडमिंटनपटू होते. 

नंदू नाटेकर यांना पहिले क्रिकेटपटू व्हायचे  होते आणि ते क्रिकेटही खेळले. पण त्याचे मन क्रिकेटमध्ये नव्हते. यानंतर नंदूने बॅडमिंटनकडे आपले लक्ष वेधले आणि  बॅडमिंटनमध्ये नवीन स्थान मिळवले. 
 
त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी 1953 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांनी आपल्या बॅडमिंटन कारकीर्दीत बरीच कामगिरी केली. 1954 मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरी गाठली. नंतर त्यांनी पुन्हा कधीही या स्पर्धेत भाग घेतला नाही.