शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (12:28 IST)

टोकियो ऑलिम्पिक :महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचली

टोकियो ऑलिम्पिकचा आज पाचवा दिवस आहे.पहिल्या चार दिवसांत भारताने आतापर्यंत पदक जिंकले आहे, जे मीराबाई चानूने पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले होते. पाचव्या दिवशी भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेन रे विरूद्ध 3-0 असा शानदार विजय नोंदविला. अशाप्रकारे भारताने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.यापूर्वीच्या सामन्यात पुरुष हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-7 असा पराभव झाला होता. सौरभ चौधरी आणि मनु भाकरच्या जोडीने  शूटिंगमध्ये निराश केले.तिसर्‍या फेरीत पराभवानंतर शरत कमलचा टेबल टेनिसमधील प्रवास संपुष्टात आला.चीनच्या मा लाँगने त्याचा पराभव केला.
 
भारताची महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने जर्मनीच्या एपेट्ज नेडिनला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना तिने स्प्लिट  निर्णयाने जिंकला.भारताची महिला बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन हिने पहिल्या फेरीत विजय मिळवला.भारताची महिला बॉक्सरलव्हलिना बोरगोहेनचा सामना जर्मनीच्या एपेट्ज नेडिनशी होईल.ती 69 किलो वजनाच्या गटात खेळेल.