बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

पुरुष फुटबॉल संघ १०१ व्या स्थानावर

कम्बोडिया तसेच म्यानमारविरुद्ध विजयाची नोंद करताना भारताच्या पुरुष फुटबॉल संघाने फिफाच्या ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेत १०१ वे स्थान पटकवले आहे.

गेल्या २० वर्षांतील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. भारतीय संघ मागच्या महिन्यात १३२ व्या स्थानी होता. कम्बोडियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात ३-२ ने आणि मॅनमारविरुद्ध १-० ने विजय नोंदविताच भारताला ३१ स्थानांचा लाभ झाला. याआधी १९९४ साली भारतीय संंघाने ९४ व्या, १९९३ मध्ये ९९ व्या, आणि १९९६ मध्ये १०० वे स्थान मिळविले होते.

अ.भा. फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महासचिव कुशाल दास यांनी संघाचे कौतुक करीत यशाचे श्रेय खेळाडू आणि सहयोगी स्टाफला दिले. नवे रँकिंग मिळविल्यानंतर भारतीय संघाला ७ जून रोजी पहिला आंतरराष्ट्रीय सामना लेबनॉनविरुद्ध खेळायचा आहे.