शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

काळ्या फिती बांधून हॉकी संघाचा निषेध!

क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानने भारतीय संघाची पार दाणादाण उडवली असली तरी हॉकीमध्ये भारताच्या वीरांनी पाकवर जबरदस्त सर्जिकल स्ट्राइक करून देशवासीयांच्या दु:खावर फुंकर घातली आहे.
 
हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेत पाकविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघ दंडावर काळ्या फिती बांधून मैदानावर उतरला होता. त्या नेमक्या कशासाठी आहेत, कशाच्या निषेधार्थ आहेत, हे कुणालाच ठाऊक नव्हते. परंतु, ते जेव्हा समोर आले तेव्हा भारतीयांची मान उंचावली आणि पाकिस्तानची शरमेने खाली गेली.
 
पाक सैन्याकडून काश्मीरमध्ये होत असलेल्या भ्याड हल्ल्यांचा निषेध म्हणून भारतीय हॉकीपटूंनी या काळ्या फिती लावल्या होत्या. 
 
देशाबद्दलचा, लष्करी जवानांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी भारतीय खेळाडू आणि स्पोर्ट स्टाफने एकमताने हा निर्णय घेतला होता. अर्थात, भारतीय हॉकी संघाने आपली राष्ट्रनिष्ठा व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2016 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद भारतीय जवनांना अर्पण केले होते. पाकिस्तानला धूळ चारूनच टीम इंडियाने हा विजय साकारला होता.