शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 1 मे 2023 (07:36 IST)

बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या सात्विक-चिराग जोडीला सुवर्ण पदक

badminton
बॅडमिंटनपटू सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्ण पदक मिळवलं आहे. गेल्या 58 वर्षांपासून कुठल्याच भारतीय बॅडमिंटनपटूला या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवता आलं नव्हतं.
 
भारतानं 1965 मध्ये शेवटचं सुवर्णपदक जिंकलं होतं. तेव्हा दिनेश खन्ना यांनी लखनऊमध्ये थायलंडच्या सांगोब रत्तनुसोर्न यांना एकेरी सामन्यात पराभूत केलं होतं.
 
जागतिक चॅम्पियनशिप 2022 ची कांस्य पदक विजेत्या जोडीने मलेशियाच्या ओंग यू सिन आणि तिओ येइ यी या जोडीला 21-16, 17-21, 19-21 ने पराभूत केलं.
 
पीटीआयच्या वृत्तानुसार, यापूर्वी 1971 मध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी दीपू घोष आणि रमन घोष या जोडीने कांस्य पदक जिंकलं होतं.
 
आसामचे मुख्यमंत्री आणि बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष हिमंत बिस्वा सरमा यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "चिराग आणि सात्विक, तुमचा आम्हाला अभिमान आहे. आशियात सर्वोत्तम होणं केवळ ऐतिहासिक नाही, तर भारतीय बॅडमिंटनसाठीही मोठा क्षण आहे. संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची बाब आहे."
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सात्विक आणि चिराग या खेळाडूंचं अभिनंदन केलंय.
 
यंदाच्या चॅम्पियनशिपचं आयोजन दुबईत करण्यात आलं होतं.

Published By -Smita Joshi