दुखापतग्रस्त असूनही लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघात समावेश
गुडघ्याच्या दुखापतीनंतरही लिओनेल मेस्सीचा उरुग्वे आणि ब्राझीलविरुद्धच्या आगामी दोन विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीसाठी अर्जेंटिनाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे मेस्सी पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) विरुद्ध रेड बुल लाइपझिग विरुद्ध खेळले नाही, परंतु प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी मेस्सीला 12 आणि 16 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्यांसाठी संघात ठेवले आहे.
संघात सहा नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. अर्जेंटिनाचे 11 सामन्यांतून 25 गुण आहेत आणि पुढील वर्षी कतर येथे होणा-या विश्वचषकात प्रवेश करण्यासाठी त्यांना आणखी दोन सामने जिंकावे लागतील.
अर्जेंटिना संघ
गोलरक्षक: फ्रँको अरमानी, एमिलियानो मार्टिनेझ, जुआन मुसो, फेडेरिको गोम्स गर्थ.
डिफेंडर्स : गोन्झालो मोटीएल, नहुएल मोलिना लुसेरो, क्रिस्टियानो रोमेरो, जर्मन पेजेला, निकोलस ओटामेंडी, लुकास मार्टिनेझ, निकोलस टॅगलिफिको, लिसांड्रो मार्टिनेझ, मार्कोस अकुना.
मिडफिल्डर: गुएडो रॉड्रिगुएज, लींड्रो परेडेस, एन्झो फर्नांडेझ, रॉड्रिगो डी पॉल, एक्सिकुएल पॅलासिओस, जिओव्हानी लो सेल्सो, निकोलस डॉमिन्गुएझ, सॅंटियागो सिमोन, क्रिस्टियन मेडिना, मॅटियास सोल, थियागो अलमांडा.
फॉरवर्ड्स: एंजल डी मारिया, लिओनेल मेस्सी, लॉटारो मार्टिनेझ, एंजल कोरिया, पॉल डायबाला, ज्युलियन अल्वारेझ, जोक्विन कोरिया, निकोलस गोन्झाले, इझेकुएला जेबालोस.