गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 5 मार्च 2022 (21:39 IST)

युक्रेनची टेनिस पटू एलिना स्विटोलिना ने रशियाच्या अनास्तासिया पोटापोव्हाला पराभूत केले

युक्रेनच्या एलीना स्विटोलिना हिने मॉन्टेरी ओपन 2022 मध्ये महिला एकेरीच्या 32व्या फेरीच्या सामन्यात रशियाच्या अनास्तासिया पोटापोव्हाचा पराभव केला. याआधी युक्रेनची टेनिसपटू एलिना स्विटोलिना हिने रशिया किंवा बेलारूसच्या कोणत्याही खेळाडूसमोर ही स्पर्धा खेळणार नाही, असे जाहीर केले होते, जर तिच्या नावासमोर कोणत्याही प्रकारे रशियाचा उल्लेख केला गेला.
 
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) रशिया आणि बेलारूसवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. तथापि, युक्रेनची दिग्गज टेनिसपटू एलिना स्विटोलिना हिने बुधवारी रशियाच्या अनास्तासिया पोटापोव्हाला पराभूत केले आणि त्यानंतर तिने या स्पर्धेची बक्षीस रक्कम युक्रेन आर्मीला दान करणार असल्याचेही जाहीर केले. एलिना स्विटोलीनाने सेंटर कोर्टवर अनास्तासिया पोटापोव्हाचा 6-2आणि 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव केला