शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (20:00 IST)

Vivo Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण यांच्यात सामना

प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी (11फेब्रुवारी) रोजी सामना संध्याकाळी हरियाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण यांच्यात होणार आहे. हरियाणा स्टीलर्सचा संघ सलग 3 सामने जिंकून येथे पोहोचला तर पुणेरी पलटणला शेवटच्या सामन्यात पाटणा पायरेट्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. 
हरियाणाचा संघ 58 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 18 सामन्यांत 9 विजय, 6 पराभव आणि 3 अनिर्णित सामना केला आहे. त्याचवेळी, पुणेरी पलटणने 16 सामन्यांत 8 विजय आणि 8 पराभवांचा सामना केला आहे. संघ 42 गुणांसह 11व्या स्थानावर आहे.