1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: ब्रिस्बेन , सोमवार, 9 जानेवारी 2012 (14:24 IST)

अ‍ॅण्डी मुरे ब्रिस्बेन इंटरनॅशनल विजेता

जागतिक चौथ्या क्रमांकावरील अ‍ॅण्डी मुरे याने अलेक्‍झांडर डोलगोपोलोव्ह याचा अंतिम फेरीतील लढतीत केवळ 65 मिनिटातच फडशा पाडत ब्रिस्बेन इंटरनॅशनल अजिंक्यपद पटकावले.

मुरे याने जागतिक चौदाव्या क्रमांकाच्या युक्रेनच्या अलेक्‍झांडर डोलगोपोलोव्हला 6-1, 6-3 असे पराभूत केले. या विजयाने मुरे याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील आपणही एक प्रबळ दावेदार असल्याचा संदेशही दिला आहे.