फेल्प्सने ऑलिम्पिक इतिहास घडविला
‘जलतरणातील सम्राट’मायकेल फेल्प्सने जलतरणातील 22 वे सुवर्णपदक पटकावित तब्बल दोन हजार वर्षे जुना ऑलिम्पिकमधील विक्रम मोडला.
वैयक्तिक स्पर्धामध्ये सर्वाधिक विजेतेपदे पटकाविण्याचा हा विक्रम चक्क ख्रिस्तपूर्व काळातील होता. तो फेल्प्सने मोडला.
फेल्प्सने 22 सुवर्णपदके मिळविली आहेत. पण यातील नऊ सुवर्णपदके त्याला रिले शर्यतींमध्ये मिळाली आहेत. फेल्प्सने 13 वैयक्तिक शर्यतींमध्ये सुवर्णपदके पटकाविली आहेत. वैयक्तिक शर्यतींमध्ये सर्वाधिक विजेतेपद मिळविण्याचा यापूर्वीचा विक्रम लिओनिडॅस र्होड्स याच्या नावे होता. ख्रिस्तपूर्व काळात झालेल्या चार ऑलिम्पिक स्पर्धामध्ये त्याने भाग घेतला होता.