मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. फिल्लमबाजी
Written By विकास शिरपूरकर|

अभिजात गायकीचा दीपस्‍तंभः किशोर कुमार

भारतीय चित्रपटसृष्‍टीचा इतिहास लिहायचा झाल्‍यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होउ शकणार नाही. 60 च्‍या दशकातील देवआनंद पासून ते 80 च्‍या दशकातील अनिल कपूर पर्यंतच्‍या अनेक नायकांना यशाची चव चाखविण्‍यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलीवूडला पहिला सूपरस्‍टार राजेश खन्‍ना यांच्‍या रुपाने मिळाला मात्र त्‍यामागेही किशोरदांचा खास योडली आवाजच होता हे नाकारून चालणार नाही. या हरहुन्‍नरी नायक व गायकाच्‍या जन्‍मदिवसानिमित्‍त....
गायनात तल्लीन होऊन गाणारा गायक म्हणून किशोर कुमार यांची आबालवृद्धांमध्ये ओळख आहे. किशोरदांनी गाण्यात जीव ओतून त्यांना विविध रंग चढवून मैफिली सजविल्या आहेत. चित्रपटातही ते चमकले व अभिनयातूनही किशोरदांच्या स्मृती जिवंत आहेत.
 
बारा वर्षाचे किशोरदा रेडिओवर गाणे ऐकून स्वत: त्याच्या धुनांवर थिरकत होते. तसेच चित्रपटामधील गीतांची पुस्तके जमा करून त्यातील गीतांना वेगळ्या शैलीत घरी आलेल्या पाहुण्यासमोर अभिनयासह सादर करत व त्यांच्याकडून बक्षीसही मागून घेत असत.
 
किशोरदाचे वडीलबंधू दादा मुनी उर्फ अशोक कुमार व अनुप कुमार यांचे बोट धरून स्वत:चे नशीब अजमावण्यासाठी त्यांनी चित्रपटातील अभिनयातून करियरचा श्रीगणेशा केला. त्यावेळी चित्रपट सृष्टीत अभिनेत्यामध्ये सर्व गुण पाहिले जात होते. त्यात अभिनेत्याला गायनाच्या कसोटीमधून ही जावे लागत होते. 
 
काढण्याची. 1950 साली आभास कुमार व कुंजालाल गांगुली यांनी किशोर कुमारला 'मुकद्दर' मध्ये काम दिले. त्यात किशोरदाचा रोल ही तसा चांगलाच होता. मात्र त्यात त्यांना गायनाची संधी मिळाली नाही. त्यानंतर 1951 मध्ये किशोरदा मन्नाडे यांच्यासह गायलेच. मात्र त्यांना त्यावेळी त्यांनी जागा मिळाली ती पार्श्वगायकांच्यामध्ये, तीही 'आंदोलन' चित्रपटात.
 
प्रत्येक व्यक्तीच्या मागे मोठा संघर्ष असतो व त्या संघर्षाला किशोरदाही कसे अपवाद राहणार. 1952 ते 1960 दरम्यान किशोरदाने बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अधिकार, धोबी डॉक्टर, इल्जाम, मिस माला, नोकरी, पहिली झलक हे चित्रपट तर त्यांनी अवघ्या एका वर्षात म्हणजेच 1954 मध्ये आटोपल्या. त्यानंतर त्यांनी अभिनयासह आवाजाला दिशा मिळाली. अभिनय व गायन यांचा किशोरदांचा समांतर प्रवास सुरू झाला. 
 
1956 मध्ये नऊ चित्रपट करणारा अभिनेता म्हणून त्यांनी त्यांची नवीन ओळख जगाला करून दिली. किशोरदाने आपल्या मिश्किल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमिकांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन व संगीताच्या तालावर थिरकणे या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोरदांनी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली. नायकासह गायक यांच्या भूमिकेने तर दर्शकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी मीना कुमारी, वैजयंती माला, निम्मी, कामिनी कौशल, मधुबाला, नूतन, माला सिन्हा व बीना रॉय यांच्यासारख्या नायिकांसोबत चित्रपट केले. अभिनयासह त्यांनी या चित्रपटामध्ये गायनाची दुहेरी भूमिका केल्याने तर त्यांनी त्यांचे नाव यशाच्या शिखरावर पोहचविले. 'मेरा नाम अब्दुल रहमान', 'नखरे वाली', 'कुंएँ मे कुद जाना यार पर शादी मत करना', 'इना मीना डिका', 'हम तो मोहब्बत करेगा', 'पाच रुपया बारा आणा' अशा एक ना अनेक गीतांमधून किशोरदा आपल्यात आहेत. 
 
एके दिवशी अशोक कुमार यांच्या घरी अचानक संगीतकार सचिन देव बर्मन आले. तेव्हा बाथरुममध्ये असलेल्या किशोरदांचे स्वर त्यांच्या कानी पडले. ‘कौन गा राहा है?’ असे त्यांनी दादामुनींना विचारले. त्यावर अशोक कुमार यांनी मोठ्या गायकाची ओळख सचिन देव बर्मनला करून दिली. तेव्हा सुप्रसिद्ध संगीतकार सचिनदेव बर्मनने 'बाथरूम सिंगर' किशोरदाला ओळखले. तेव्हापासून सुमधुर गीतांचा झरा किशोरदांच्या कंठातून वाहायला प्रारंभ झाला.  

यादगार गीतांना स्वर देणारे किशोर कुमार त्यानंतर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक तर गीतकार यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसू लागले. त्यांनी त्याच्या चित्रपटासाठी गीते लिहिली नाही तर त्यांनी संगीतही दिले. 'चलती का नाम गाडी', 'बढती का नाम दाढी', 'जमीन', 'दूर का राही', 'झुमरू' आदी चित्रपट किशोरदांनी दर्शकांना नव्या रूपात दिले.

पुढील पानावर पाहा किशोरदाचं गाजलेले चित्रपट

मोठे बंधू 'दादामुनी' अशोक कुमार यांच्‍या मदतीने यांच्‍या मदतीने बॉलीवूडमध्‍ये प्रवेश केलेल्‍या आभास कुमार यांनी आपले नाव बदलवून किशोर कुमार करून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्‍या काळात बॉम्बे टॉकीजमध्ये समूहगायक म्हणून काम करीत असलेला हा उमदा गायक नंतर एक नामांकित हास्‍य अभिनेता आणि बॉलीवूडमधील सर्वाधिक गाजलेले गायक किशोरदा झाले. हिंदी चित्रपटसृष्‍टीचा इतिहास या गायकाशिवाय पूर्ण होणेच शक्‍य नाही. देव आनंद, राजेश खन्‍ना, अमिताभ बच्‍चनपासून ते नंतरच्‍या काळात ऋषीकपूर व अनिल कपूरपर्यंतच्‍या नायकांच्‍या यशात किशोरदांचे योगदान महत्‍वाचे आहे. 
 
त्‍यांनी ८१ चित्रपटात काम केले आहे. त्यांचे अभिनेते म्हणून गाजलेले चित्रपटः 
पडोसन (१९६८) 
दूर गगन की छाँव में (१९६४) 
गंगा की लहरें (१९६४) 
मिस्टर एक्स इन बॉंम्बे (१९६४) 
हाफ टिकट (१९६२) 
मनमौजी (१९६२) 
झुमरू (१९६१) 
चलती का नाम गाड़ी (१९५८) 
दिल्ली का ठग (१९५८) 
आशा (१९५७) 
न्यू दिल्ली (१९५६) 
बाप रे बाप (१९५५) 
मिस माला (१९५४) 
नौकरी (१९५४) 
 
तर त्‍यांनी ५७४ चित्रपटात गायले आहे. त्यांचे गायक म्हणून गाजलेले चित्रपटः 
 
मिस्टर इंडिया (१९८७) 
सागर (१९८५) 
शराबी (१९८४) 
अगर तुम ना होते (१९८३) 
सत्ते पे सत्ता (१९८२) 
नमक हलाल (१९८२) 
लावारिस (१९८१) 
रॉकी (१९८१) 
याराना (१९८१) 
कर्ज़ (१९८०) 
मुकद्दर का सिकंदर (१९७८) 
डॉन (१९७८)  
अनुरोध (१९७७) 
शोले (१९७५) 
खुशबू (१९७५) 
जुली (१९७५) 
आंधी (१९७५) 
मीली (१९७५) 
पोंगा पंडित (१९७५) 
रोटी (१९७४) 
कोरा कागज़ (१९७४) 
अभिमान (१९७३) 
यादों की बारात (१९७३) 
परिचय (१९७२) 
रामपुर का लक्ष्मण (१९७२) 
बॉम्बे टू गोवा (१९७२) 
मेरे जीवन साथी (१९७२) 
हरे राम हरे कृष्ण (१९७१) 
अमर प्रेम (१९७१) 
अंदाज़ (१९७१) 
बुढा मिल गया (१९७१) 
शर्मीली (१९७१) 
प्रेम पुजारी (१९७०) 
कटी पतंग (१९७०) 
प्यार का मौसम (१९६९) 
पडोसन (१९६८) 
ज्वेल थीफ (१९६७) 
गाइड (१९६५) 
तीन देवीयाँ (१९६५) 
दूर गगन की छाँव में (१९६४) 
मिस्टर अँक्स इन बोँम्बे (१९६४) 
हाफ टिकट (१९६२) 
मनमौजी (१९६२) 
झुमरू (१९६१) 
दिल्ली का ठग (१९५८) 
नौ दो ग्यारह (१९५७) 
पेइंग गेस्ट (१९५७) 
फंटूश (१९५६) 
हाऊस नम्बर ४४ (१९५५) 
मुनिमजी (१९५४) 
टैक्सी ड्राईवर (१९५४) 
जाल (१९५२) 
बाजी (१९५१) 
बहार (१९५१)