रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|

शोबिझचा नायक तुषार जलोटा

--दीपक जाधव

PRPR
हिरो बनण्यासाठी देशभरातून अनेक युवक मुंबईत येतात. पण त्यातील सर्वांचेच हिरो बनण्याचे स्वप्न तर साकार होतेच असे नाही. परंतु, शोबिझ या मुकेश भट प्रॉडक्शनचा नायक तुषार जलोटा हा तसा सुदैवीच म्हणायला हवा. या चित्रपटातील हिरो गावावरून मुंबईत येतो. मग म्युझिक रिऍलिटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन एका रात्रीत स्टार होतो.

तुषारच्या बाबतीत अगदी असेच घडले. तुषारने पाच वर्षे महेश भट्ट यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. कलयुग या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन दरम्यान महेश भट यांनी त्याला सांगितले, की तुझ्या नशीबात स्टार होण्याचे सर्व गुण आहेत. त्यानंतर त्यांनीच तुषारचे नशीब बदलले. तुषार त्यांच्या शोबिझचा नायक झाला. शोबिझ उद्या (ता.२८) प्रदर्शित होत आहे.

तुषार म्हणाला, की महेश भट आणि कंपनीबरोबर मी गेल्या पाच वर्षांपासून जोडलेला आहे. या दरम्यान माझा लुक व ऍक्टिंग टॅलेंट त्यांनी अचुक हेरले. तसे मला आधीपासूनच हिरो बनायचे होते, पण संधी मिळाली नाही. अखेर सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका साकारत मी माझ्या मूळ उद्दीष्टापर्यंत पोहोचलो.

IFMIFM
शोबिझमध्ये रोहन आर्य या मध्यवर्ती भूमिकेत मी आहे. ही भूमिका आव्हानात्मक आहे. विशेष फिल्मस्‌ बॅनर्ससोबत काम करण्याचा माझा अनुभव चांगला आहे. एका कुटूंबाप्रमाणे आम्ही सर्व रहातो. १८ तास काम करूनही कधी कंटाळा येत नाही. इथे शिकायला देखील खूप मिळते. आधीपासूनच मी सेटवर खूप वेळ घालवायचो. तिथे जे काही शिकलो, त्याचा फायदा आता झाला. नायिका मृणालिनी ही एक चांगली कलाकार आहे. आमचे टयुनिंग चांगले जमल्याने शॉट लवकर ओके होतो. दोघे पहिल्यांदाच एकत्र येत असूनही गोंधळलो नाही. सर्व काही मनासारखे झाले.