महेंद्र कपूर - 'तेरे प्यार का आसरा चाहता हूँ'
प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांचे नुकतेच निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. हिंदी संगीतात अनेक दिग्गज गाजत असतानाच त्याचे आगमन झाले, हे त्यांच्यादृष्टीने दुदैवाची बाब म्हणावी लागेल. त्यामुळेच की काय त्यांच्या प्रतिभेला न्याय मिळाला नाही. तरीदेखील एवढ्या स्पर्धेतही त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली.................................................................
सुरुवातीचे जीवन महेंद्र कपूर यांचा जन्म 9 जून 1934 मध्ये अमृतसर मध्ये झाला. व्यापारी घरात त्यांचा जन्म झाला. पण, त्यांना या व्यवसायात रुची नव्हती तर गीत-संगीताकडे त्यांचा वाढता कल होता. त्यांचे कुटुंब मुंबईत आले तेव्हा महेंद्र कपूर यांना एक दिशा मिळाली. या मार्गावर खूप संघर्ष करावा लागणार हे त्यांना माहीत होते पण, त्यांनी कधीच हार मानली नाही.शालेयस्तरावरच त्यांचा गोड आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेऊ लागला. प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन घेतले. सेंट जेवियर्स कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. संगीत की शिक्षा उन्होंने पं. तुलसीराम शर्मा, उस्ताद नियाज अहमद, मनोहर पोतदार, फैयाज अहमद तसेच पंडित हुस्नलाल यांच्याकडून त्यांना संगीताचे धडे गिरवले. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या आवाजाची चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. 'मदमस्त' या चित्रपटासाठी त्यांनी सर्वप्रथम पार्श्वगायन केले.................................................................
चतुसस्त्र गायक गीत, गझल, भजन, कव्वाली सारखे सर्व प्रकार ते सहजरीत्या गात असत. त्यांच्या काळातील नौशाद, सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, रवी, कल्याणजी-आनंदजी, खय्याम अशा जवळजवळ सर्व संगीतकारांसाठी ते गायले आणि अभिनेत्यांना आवाज दिला. रफी यांच्या आवाजाशी त्यांचा आवाज मिळताजुळता होता. तरीदेखील त्यांना आपल्या आवाजाची स्वतंत्र ओळख केली होती. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांच्यासारख्या गायकांमुळे त्यांना कमी संधी मिळाली. बी. आर. चोपड़ा आणि मनोज कुमार यांच्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. बी. आर. चोप्रा, संगीतकार रवी आणि महेंद्र कपूर या त्रिवेणीने अनेक यादगार गीते गायली. चोप्रा यांची 'धूल का फूल', 'वक्त', 'हमराज', 'धुँध' यांच्या अनेक चित्रपटांमध्ये महेंद्र कपूर यांना गायन केले.................................................................
लोकप्रियता अजूनही कायम मनोज कुमार यांच्या 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यांसारखे अनेक चित्रपट यशस्वी होण्यामध्ये महेंद्र कपूर यांचेही योगदान आहे. या चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपरगीते हिट झाली. 'मेरे देश की धरती' या गीताची लोकप्रियता अजूनही कायम आहे. त्यातील जोषपूर्ण आवाज रोमांच उभा करणारा आहे. हिंदीबरोबरच त्यांनी इतर भाषांमध्येही गीते गायली. मराठी चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर त्यांचे खूप जमले. ................................................................
पुरस्कार आणि सन्मानमहेंद्र कपूर यांना आपल्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार, तीनवेळा फिल्म फेयर पुरस्कार, गुजरात प्रदेशाचा श्रेष्ठ गायक पुरस्कार, लता मंगेशकर सन्मान सारखे अनेक पुरस्कार मिळाले. देश-विदेशात त्यांनी अनेक चॅरिटी शो केले. ................................................................
प्रमुख गीत * तुम अगर साथ देने का वादा करो* लाखो हे यहाँ दिल वाले पर प्यार नहीं मिलता * चलो एक बार फिर से अजनबी बन जाएँ * तेरे प्यार का आसरा चाहता हूँ* मेरे देश की धरती सोना उगले * मेरा रंग दे बसंती चोला * है प्रीत जहाँ की रीत सदा * अब के बरस तुझे* नीले गगन के तले * किसी पत्थर की मूरत से * भारत का रहने वाला हूँ * फकीरा चल चला