सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2023
  3. तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (14:27 IST)

टीव्ही चर्चेदरम्यान बीआरएस आमदाराने भाजप उमेदवाराचा गळा पकडला, धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल

fight in live tv debate
Telangana election news तेलंगणा विधानसभा निवडणुकीसंदर्भात एका तेलगू वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या खुल्या चर्चेदरम्यान बुधवारी भारत राष्ट्र समिती (BRS) आमदार आणि भाजपमधील त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्यात हाणामारी झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली.
 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये चर्चेदरम्यान नाराज बीआरएस आमदार भाजप नेत्याचा गळा पकडून त्यांना शिवीगाळ करताना दिसत आहेत.
 
व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे पोलिसांनी आणि इतरांनी हस्तक्षेप करून दोघांना वेगळे केले. राज्यात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी आरोप केला आहे की हैद्राबादच्या कुथबुल्लापूर येथील बीआरएस आमदार केपी विवेकानंद यांनी कुना मतदारसंघातील भाजप उमेदवार श्रीशैलम गौड यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ न शकल्याने त्यांनी हल्ला केला.
 
रेड्डी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, विवेकानंदांनी गौर यांच्यावर केलेला हल्ला भ्याडपणाचे कृत्य आहे. पोलिसांनी बीआरएस आमदारावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा भाजप कायदेशीर लढाई लढेल, असे ते म्हणाले.