शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (10:41 IST)

WhatsApp ने पैसे देत असाल तर सावधगिरी बाळगा

जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा मॅसेंजर व्हॉट्सअ‍ॅप भारतात देखील तितकाच लोकप्रिय आहे. याची लोकप्रियता अशाने सिद्ध होते की भारतात याचा शिवाय इतर कोणतेही दुसरे मॅसेंजिंग अ‍ॅप नाही. भारतात तब्बल 400 दशलक्ष लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. असे म्हणतात की प्रत्येक स्मार्टफोन वापरणारी व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप वापरते. तथापि, याची लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या मूळ कंपनी फेसबुकने यूपीआय पेमेंट सुरू करण्यासाठी भारत सरकारची परवानगी मागितली. 

एकीकडे जिथे पेटीएम, फोनपे, गूगलपे या कंपन्यांनी डिजीटल पेमेंट क्षेत्रात ग्राहकांचा चांगला आधार तयार केलेला आहे, तर व्हॉट्सअ‍ॅपला परवानगी मिळायला वेळ लागल्या बाबत प्रश्न उद्भवत होते. तथापि, या मध्ये वेळ लागण साहजिकच होते, कारण व्हॉट्सअ‍ॅप सध्या एक बरेच मोठे मॅसेजिंग अ‍ॅप बनलेले आहेत आणि याच्याने पेमेंट सुविधा असल्याने, मोठ्या प्रमाणात फसवेगिरी होण्याची शक्यता देखील होती. 
 
जे लोक फारसे शिक्षित नाही, तांत्रिकदृष्टया देखील जागरूक नाहीत, ते देखील करोडोच्या प्रमाणात व्हॉट्स अ‍ॅप वापरतात. कदाचित एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्यामधील प्रत्येक बाबीचा शोध घेत होती. तथापि, व्हॉट्सअ‍ॅपच्या यूपीआयची सर्वोत्कृष्ट पेमेंटची चाचणी कंपनीने आधीपासूनच केली होती आणि ती त्यामध्ये यशस्वी देखील झाली. तरी ही कंपनीला लायसेन्स मिळविण्यासाठी सुमारे 3 वर्षे वाट बघावी लागली. तथापि आता या देयासाठीची परवानगी मिळालेली आहे, तर मग जाणून घेऊ या की त्याद्वारे देय कसे पाठवले जाऊ शकतात. 
 
या साठी सर्वप्रथम गुगलच्या अँड्रॉइड प्ले स्टोअर मधून व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावं. 
त्या नंतर आपण व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जावे आणि तिथे आपल्याला पेमेंटचा पर्याय दिसेल. 
या नंतर आपण पेमेन्टच्या विभागात गेल्यावर आपल्याला New Payment आणि Add New Payment चा विकल्प दिसेल.
इथे आपण Add New Payment मेथड निवडा. 
त्या नंतर आपल्याला आपली बँक निवडायची आहे.
बँक निवडताना आपल्याला अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी SMS या पर्यायाला निवडायचे आहे. 
लक्षात असू द्या की आपला व्हॉट्सअ‍ॅपचा नंबर तोच असावा, जो नंबर आपल्या बँकेच्या खात्याशी जोडलेला आहे. 
नंबर वेगळा असल्यास व्हेरिफिकेशन अयशस्वी होणार.
शेवटी आपण UPI पिन सेटअप कराल, जे अनिवार्य आहे.
येथे आपले खाते सेटअप होण्याचे कार्य पूर्ण होते. 
 
त्या नंतर आपणास व्हॉट्सअ‍ॅप वरील कोणतेही कॉन्टॅक्ट नंबर 3 सेकंद दाबून किंवा टॅप करून निवडायचे आहे आणि नंतर अटेचमेंट आयकॉन वर जाताच पेमेंटचे पर्याय दिसून येईल, इथे रक्कम प्रविष्ट करा आणि कोणत्याही यूपीआय वापरणाऱ्यास व्यक्तीस पाठवून द्या.
 
तर ही होती पद्धत व्हॉट्सअ‍ॅप वरून पेमेंट पाठविण्याची, परंतु हे करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेण्याची फार गरज आहे, जे आपल्याला फ्रॉड पेमेंट पासून वाचवू शकते.
 
सर्वप्रथम आपल्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट मोड ऍक्टिव्हेट करण्यापूर्वी मोबाइलचा स्क्रीन लॉक बदलून द्या. बऱ्याच वेळा असे होतं की लोक साधारण लॉक ठेवतात जे त्यांच्या मित्रांना आणि नातेवाइकांना माहिती असतं. लोक एकमेकांचे व्हॉट्सअ‍ॅप देखील चेक करून घेतात, पण आता ही बाब आहे पेमेंटची तर आपण आपल्या मोबाइलचे कोड आणि व्हॉट्सअ‍ॅप उघडण्याचे कोड अत्यंत गुपितच ठेवावं.
 
UPI पिन चा नंबर कठीण ठेवा - 
सर्वसाधारणपणे, बरेच लोक त्यांची जन्मतारीख, किंवा 1234 सारखे साधारण पिन ठेवतात, जे हॅक होण्याची दाट शक्यता असते, म्हणून असे नंबर प्रविष्ट करा, ज्याला सामान्यपणे ओळखता येणं अवघड असेल.
 
स्पॅमिंग आणि फिशिंग पासून सावध राहा- 
या मुळे चांगले -चांगले लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी ठरतात. विश्वास ठेवा की जर आपण एखाद्या अनोळखी माणसाच्या चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवता, तर आपली फसवणूक होण्याची शक्यता दाट आहे, खास करून देय देणे आणि घेणे या दोन्ही गोष्टींमध्ये. होय! फिशिंग म्हणजे मासेमारी करणं आमिष दाखवून मासे जाळ्यात अडकवणे.

तर नक्कीच, कोणीतरी आपल्याला असे कोड स्कॅन करण्यास सांगतात आणि मिळवा कॅश परत किंवा अमुक वस्तूंवर सूट मिळवा. 
 
काही लोक असे ही सांगतात की कोडला स्कॅन करा आणि हजारोच्या बक्षिसे मिळवा. अशाने बक्षिसे मिळवणे तर लांबची गोष्ट लोक पैसे गमावून बसतात. अशी बरीच उदाहरणे आहेत.

खरं तर फिशिंग मध्ये दररोज नवीन तंत्रे हॅकर्स कडून शोधली जात आहे. काळजी न घेतल्यास लोक याला बळी पडत आहे. 
 
उदाहरणार्थ, समजा आपण एखाद्या कोणत्या प्लॅटफॉर्म वर जुने सामान विकायला टाकले असल्यास आणि खरेदीदार आल्यावर म्हणतो की मी आपले सामान घेतो आत्ताच बुक करण्यासाठी आपल्याला निम्मी रक्कम देतो. आपण खुश होणार की चला आता तर आपल्या जुन्या सामानाची विल्लेवाट लागणार. आपल्याला तिथून आपल्या व्हॉट्सअ‍ॅप वर एक कोड येतो आणि आपल्याला सांगण्यात येतं की त्याला स्कॅन करतातच आपल्या खात्यात पैसे जमा होणार. आपण थोडंसं दुर्लक्ष केल्यास दुसऱ्याच क्षणी आपल्या लक्षात येत की व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटच्या माध्यमाने आपल्या बँकेच्या खात्यातून पैशाची फसवणूक झाली आहे. 
 
अशा परिस्थितीत, आपल्याला ऑनलाइन जागृत राहणे आवश्यक आहे आणि देय देण्याच्या बाबतीत कोणावर देखील विश्वास ठेवणे टाळावे. 
 
केवळ व्हॉट्सअ‍ॅपच नव्हे तर इतर सर्व डिजीटल पेमेंट पद्धतीसाठी आपल्याला सावध राहण्याची गरज आहे, तेव्हाच आपण डिजीटल क्रांतीचा फायदा घेऊ शकण्यास सक्षम असाल आणि सावधगिरीने नवीन पेमेंट पद्धती वापरण्याची आवश्यकता देखील आहे.