आता पेंशनर देखील घरी बसून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात

pension
Last Modified बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (11:58 IST)
सरकारी आणि पीएफ पेंशनधारकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा असतो. कारण या महिन्यातच त्यांना आपले जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक, पोस्ट ऑफिस किंवा EPFO मध्ये जावे लागते. जीवनप्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करावी लागते. 30 नोव्हेंबर पर्यंत हे काम पूर्ण केले नाही तर पेंशन देखील थांबविली जाऊ शकते.

व्यक्तिगत रूपाने उपस्थित राहावे लागते-
जीवन प्रमाण पत्र जमा करण्यासाठी पेंशन धारकांना अधिकृत पेंशन वितरण एजेन्सी मध्ये वैयक्तिकरित्या उपस्थित राहावे लागते किंवा ते ज्या कार्यालयात काम करीत होते, त्या कार्यालयाच्या प्राधिकार्‍याने जारी केलेल्या जीवन प्रमाणपत्राला संवितरण एजन्सीला उपलब्ध करावे लागते.

कोरोना काळात पेंशन मिळविण्यासाठी संवितरण एजन्सीमध्ये वैयक्तिकरित्या उपस्थित राहणे आणि जीवन प्रमाण पत्र मिळवणे ही पेंशन धारकांसाठी सर्वात मोठी अडचण आहे. शारीरिक दृष्टीने कमकुवत असणाऱ्या पेंशन धारकांसाठी हे तर फारच अवघड आहे.

एवढेच नव्हे तर अनेक सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या कुटुंबियांसह राहण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी इतरत्र राहू लागतात. या मुळे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरी जावे लागते.

डिजीटल प्रमाणपत्र बनवता येतंं-
जीवन प्रमाणपत्र किंवा लाईफ सर्टिफिकेट साठी पेंशनर लोकांना सरकारी कार्यालयमध्ये फेऱ्या माराव्या लागू नये या साठी सरकारने डिजीटल प्रमाणपत्राची सुविधा सुरू केली आहे. या मध्ये पेंशन धारकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी आधार नंबरचा वापर करतात. व्हेरिफिकेशन झाल्यावर एक Life certificate बनवले जाते, जे Life certificate फंड मध्ये देखील संग्रहित केले जाऊ शकते. या मध्ये पेंशन संवितरण एजेन्सी प्रमाणपत्र ऑनलाईन देखील बघू शकतात.

अशा प्रकारे डिजीटल प्रमाणपत्र मिळवू शकतो -
डिजीटल प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पेंशन धारकांना एका विशिष्ट प्रकाराची प्रमाण आयडी बनवावी लागणार. म्हणजे प्रत्येक पेंशन धारकांसाठी ही वेगवेगळी विशिष्ट आयडी असते. पेंशन धारक या आपल्या आयडीला आधार नंबर आणि बायोमेट्रिक्सचा वापर करून बनवू शकतात. पहिल्यांदा या आयडीला जनरेट करण्यासाठी पेंशन धारकांना स्थानिक सिटीजन सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी लागणार.
पेंशन धारकांना आधार नंबर, मोबाईल नंबर, पेंशन पेमेंट ऑर्डर (PPO) क्रमांक आणि पेंशन खाते क्रमांकाच्या व्यतिरिक्त बोटांचे ठसे द्यायचे असते. यशस्वी व्हेरिफिकेशन झाल्यावर मोबाईल नंबर वर एक एसएमएस पावती पाठविली जाते. या मध्ये एक पुरावा आयडी असतो.

एकदा डिजीटल जीवन प्रमाणपत्र बनल्यावर हे पेंशन सामायिक करणाऱ्या एजन्सी कडे सादर करावयाचे नसत. जीवन प्रमाण पोर्टल https://jeevanpramaan.gov.in या संकेत स्थळाच्या माध्यमाने हे काम आपण डिजिटली देखील करू शकता. एजेन्सी देखील पोर्टल वरून जीवन प्रमाणपत्र मिळवू शकते. अँड्रॉइड फोन वर उमंग अप द्वारे किंवा पीसी वरील विंडोस द्वारे देखील प्रमाण पत्र जनरेट केले जाऊ शकते.

EPFO ने पाठवले संदेश -
मोबाईल वर मेसेज पाठवून पेंशन धारकांना सांगितले आहे की या संपूर्ण वर्षात जीवन प्रमाण पत्र कधी ही सादर केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर आपण आपले जीवन प्रमाण पत्र डिसेंबर 2019 मध्ये सादर केले आहेत तर आपण या वर्षी च्या डिसेंबर 2020 मध्येच सादर करावे. जर आपण जानेवारी 2020 मध्ये सादर केले असल्यास तर एक वर्ष पूर्ण झाल्यावरच आपण जीवन प्रमाण पत्र सादर करावे. बँक ईपीएफओच्या व्यतिरिक्त आपल्या नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर देखील प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते.

खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपण जवळचे कॉमन सर्व्हिस सेंटर तपासू शकता.

जवळच्या पोस्ट ऑफिस च्या माध्यमाने देखील आपण आपले लाईफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाण पत्र सादर करू शकता. https://ccc.cept.gov.in/covid/request.aspx


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लू

बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लू
बीड जिल्ह्यातीलआंबेजोगाई तालुक्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. लोखंडी गावातील ...

औरंगाबादच्या नामांतरणावर आदित्य ठाकरे यांच सूचक विधान

औरंगाबादच्या नामांतरणावर आदित्य ठाकरे यांच सूचक विधान
औरंगाबादच्या नामांतरणाच्या वादावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत मोठं ...

नैतिकतेच्या मुद्या वरून तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की ...

नैतिकतेच्या मुद्या वरून तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही, चंद्रकांत पाटील यांचा सवाल
राज्याचे समाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्दावर राजीनामा द्यावा. ...

घरात स्मार्ट डिव्हाईस वापरत असाल तर या प्रकारे सुरक्षित

घरात स्मार्ट डिव्हाईस वापरत असाल तर या प्रकारे सुरक्षित ठेवा
काळाप्रमाणे प्रत्येक जण स्वतःला अपग्रेड ठेवू इच्छितो ऑफिस पासून ते घरा पर्यंत प्रत्येक जण ...

कोरोना लस : महाराष्ट्रात, मुंबईत लसीकरण मोहीम कशी होणार?

कोरोना लस : महाराष्ट्रात, मुंबईत लसीकरण मोहीम कशी होणार?
भारतात शनिवार - 16 जानेवारीपासून कोव्हिड 19साठीच्या लसीकरणाला सुरुवात होतेय. या ...