UP Elections: भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यांनी सासरे मुलायम सिंह यादव यांचा आशीर्वाद घेतला, फोटो व्हायरल
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे कारण या फोटोत त्या आपल्या सासरे मुलायम सिंह यादव यांचा आशीर्वाद घेत असताना दिसत आहेत. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव म्हणाल्या की माझ्यावर नेहमीच पंतप्रधानांचा प्रभाव राहिला आहे. माझ्या विचारात राष्ट्र नेहमीच प्रथम स्थानी आहे. राष्ट्रवाद माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.